esakal | नाकातील हाडाची शस्त्रक्रिया होणार सोपी; व्हीएनआयटीच्या प्राध्यापिकेचे संशोधन
sakal

बोलून बातमी शोधा

कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुभाष लुले यांच्यासह डॉ. रश्‍मी उद्दनवाडीकर आणि विद्यार्थीनी

नाकातील हाडाची शस्त्रक्रिया होणार सोपी; प्राध्यापिकेचे संशोधन

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी नाकाची सर्जरी करण्याची क्रेझ आहे. मात्र, ही शस्त्रक्रियेदरम्यान दोन्ही नाकपुड्यांच्या मधोमध असलेले हाड कापण्यासाठी जगभरात छेणी आणि हातोडीचा उपयोग केला जातो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया सोपी करण्यासाठी विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील मेकॅनिकल विभागाच्या डॉ. रश्‍मी उद्दनवाडीकर यांनी कान, नाक, तज्ज्ञ डॉ. सुभाष लुले व विद्यार्थिनी एकता ढोले, एम. किर्राना यांच्या मदतीने ‘मिडीयल ऑस्टियोटॉमी फोरसेप्स’ हे तंत्र विकसित केले आहे.

अपघात किंवा एखाद्या दुर्घटनेमुळे अनेकदा नाक विकृत होते. याशिवाय ओबडधोबड असलेले नाक व्यवस्थित करीत त्याला खुलवण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. बॉलिवूडमध्ये सिनेतारका अशा शस्त्रक्रिया नेहमीच करीत असतात. त्यासाठी नाकाच्या पिरॅमिड संरचनेतील मधले हाड शस्त्रक्रिया करून कापण्यात येते. या शस्त्रक्रियेला ‘मिडीयल ऑस्टियोटॉमी’ असे म्हणतात.

हेही वाचा: फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

नाकाच्या खोबणीत अत्यंत कमी जागा असल्याने शस्त्रक्रिया करताना इतर भागांना इजा होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी छेणी-हातोडीचा उपयोग केला जातो. त्यामुळे ती शस्त्रक्रिया पार पडल्यावर ती बरी होण्यासही बराच वेळ लागतो. त्यामुळे विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील मेकॅनिकल विभागाच्या डॉ. रश्‍मी उद्दनवाडीकर यांनी कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुभाष लुले व विद्यार्थिनी एकता ढोले, एम. किर्थाना यांच्या मदतीने ‘मिडीयल ऑस्टियोटॉमी फोरसेप्स’चा शोध लावला. यामुळे शस्त्रक्रियेसाठी छेणी-हातोडीचा उपयोग पूर्णपणे बंद होणार असून शस्त्रक्रियाही सोपी होते. तसेच रुग्णाला बरे होण्यात कमी वेळ लागतो. विशेष म्हणजे या संशोधनाला आता ‘पेटंट’ही मिळाले आहे.

जगात नाकाच्या हाडावरील शस्त्रक्रियेसाठी पारंपरिक पद्धतीचा आतापर्यंत उपयोग केला जात होता. त्याला छेद देत ‘मिडीयल ऑस्टियोटॉमी फोरसेप्स’ हे तंत्र विकसित केले. आता त्यातून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
- डॉ. रश्‍मी उद्दनवाडीकर, प्रोफेसर व्हीएनआयटी
loading image
go to top