Navratri festival 2022 : नवरात्रीसाठी नव्या गीतांचा नजराणा

नागपूरकर कलावंत घेत आहेत मेहनत; गाण्यांना जबलपूरी बाज
Navratri festival 2022 New songs for Navratri nagpur
Navratri festival 2022 New songs for Navratri nagpur sakal

नागपूर : नवरात्र आणि त्यानिमित्त तयार करण्यात येणारी गाणी हे एक अनोखे समीकरण प्रत्येक नवरात्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळते आहे. यावर्षी देखील कलावंत गेल्या दोन महिन्यांपासून गाणे रचण्यावर भर देत असून प्रसिद्ध भक्तिगीत गायक विशाल जोगदेव यांच्यासह नागपूरकर कलावंत आठ गाणी घेऊन येत आहेत. हिंदी भाषेतील या गाण्यांना ‘जबलपूरी स्टाईल’चा तडका आहे.

विशेष शैलीमध्ये तयार झालेल्या गाण्यांचे स्वर यंदा नवरात्रीनिमित्त भाविकांसह गरबा प्रेमींना ऐकायला मिळणार आहे. कोरोना काळात दोन वर्षे गाणी तयार करणाऱ्या कलावंतांसह नवरात्र उत्सवाचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर निर्बंधामुळे विरजण पडलेले होते. यंदा मात्र, मोठ्या धूम धडाक्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने गाणे तयार करणाऱ्या नवरात्रीसाठी नव्या गीतांचा नजराणा कलावंतांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे.

प्रसिद्ध भक्तिगीत गायक विशाल जोगदेव आणि समूहाने या निमित्त या आठ गाण्यांची निर्मिती केली असून लवकरच ती भाविकांना ऐकायला मिळणार आहे. ‘कोराडी की मालकीण, शेर नाचे, मय्या मेरी शेरावाली, माता के मंदिर मे शेर आगया यासह ‘चली-चली पालखी’ या मूर्ती विसर्जनावरील गाण्यांचाही यामध्ये समावेश आहे. गायक विशाल जोगदेव, पं. राकेश तिवारी यांनी सर्व गीते गायली असून विशाल जोगदेव या गाण्यांची रचना केली आहे. तर, आशिष कठाळे, तुषार जोगदेव यांची निर्मिती, सम्राट गोटेकर यांचे दिग्दर्शन व संकलन, पंकज ठाकूर यांचे संगीत गीतांना लाभले आहे. तसेच, विशाल जोगदेव यांच्यासह रेवती राजन, मीनल, आशिष कठाळे, संयोनी मिश्रा, समीर दंडाळे, सचिन गिरी यांनी यामध्ये अभिनय केला आहे.

कोराडीच्या देवीवरही गाणे

नागपूरकर गायक विशाल जोगदेव यांनी गायलेल्या या गाण्यांमध्ये कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबेवर देखील एक गीत रचण्यात आले आहे. ‘कोराडी की मालकीण की मालकीण’ असे या गाण्याचे बोल आहेत. शिवाय, या आठही गाण्यांचे चित्रिकरण कोराडी परिसरामध्ये झाले आहे, हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com