राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, नागपूरहून गडचिरोलीला जाताना दुर्घटना

दोनच आठवड्यापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेल्या गीताताई हिंगे यांचं अपघाती निधन झालंय. नागपूरहून गडचिरोलीला परतत असताना त्यांचा कारला समोरून येणाऱ्या गाडीने धडक दिली.
NCP Leader Geeta Hinge Dies After Oncoming Vehicle Hits Her Car

NCP Leader Geeta Hinge Dies After Oncoming Vehicle Hits Her Car

Esakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचं गडचिरोलीत अपघाती निधन झालं. गीताताई हिंगे असं महिला प्रदेश उपाध्यक्षांचं नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्या सक्रीय होत्या. रविवारी रात्री उशिरा त्यांच्या गाडीचा पाचगाव इथं भीषण अपघात झाला. गीताताई हिंगे यांच्या निधनामुळे गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com