बलात्कार करायचाच असेल तर 'त्या' महिलांवर करा, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

Jwala Dhote Controversial Statement About Prostitution
Jwala Dhote Controversial Statement About Prostitution e sakal
Updated on: 

Jwala Dhote Controversial Statement About Prostitution :नागपूर : बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा. पण सुसंस्कृत घरातील महिलांवर बलात्कार करू नका, असं वक्तव्य राष्ट्रवादी (NCP) महिला अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे (Jwala Dhote) यांनी केलं. नागपूर पोलिस (Nagpur Police) आयुक्तांनी वारांगणांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Jwala Dhote Controversial Statement About Prostitution
नागपूर: गंगा जमुना परिसरात युवकाचा खून

पोलिसांनी नागपुरातील गंगा जमुना या रेड लाईट एरियावर कारवाई केली होती. तसेच हा परिसर सील करण्यात आला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी महिला अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे या आक्रमक झाल्या आहेत. पोलिस आयुक्तांनी एका ६० वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केली. त्याचा निषेध करण्यासाठी ज्वाला धोटे यांनी वारांगणांसह मानवी साखळी करत आंदोलन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.

काय म्हणाल्या ज्वाला धोटे? -

''माझ्या समस्त माता-बहिणी वारांगणा लोकांना आवाहन करतात की, बलात्कार करायचा असेल, स्वतःच्या शरीराची भूक भागवायची असेल तर आमच्याकडे या. परंतु, सुसंस्कृत घरातील महिलांवर, मुलींवर वाईट नजर टाकू नका. नराधमांची भूक भागवण्यासाठी आम्ही आहोत. पण, सुसंस्कृत घरातील महिलांकडे वाईट नजरेनं पाहू नका'', असं आवाहन माझ्या वारांगण महिला करत आहेत, असं ज्वाला धोटे यावेळी म्हणाल्या.

नागपुरात काही दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्कार झाला. गांजाच्या नशेत हा बलात्कार करण्यात आला. पण, नागपूर पोलिस आयुक्तांचं लक्ष नाही. गंगा जमुना बंद झाल्यामुळे हे बलात्कार वाढले आहेत, असंही ज्वाला धोटे म्हणाल्या.

जवळपास तीन महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनी गंगा-जमुना परिसरात कारवाई केली होती. हा परिसर पूर्णपणे सील केला होता. तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. याठिकाणी अवैध धंदे चालत असल्यानं ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, शेकडो वारांगणाच्या पोटापाण्याचं काय? असा प्रश्न उपस्थित करत ज्वाला धोटे आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी अनेकवेळा आंदोलन करत राष्ट्रवादी घटकपक्ष असलेल्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com