

Bhandara Political Clash NCP Leader Points Gun At Shinde Sena Member Police Case Registered
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यानं नुकत्याच शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या नेत्यावर बंदूक रोखल्याची घटना समोर आलीय. आर्थिक व्यवहारांवरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद होते. या वादातूनच हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येतंय. बंदूक रोखत जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप शिंदेंच्या नेत्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यावर केलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर इथं ही घटना घडलीय.