

Nepal Floods
esakal
नागपूर: २५ ऑगस्टची ती रात्र आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. काठमांडूतील मुक्कामादरम्यान मध्यरात्री मुसळधार पावसाने क्षणार्धात सर्वकाही बदलवून टाकले. डोळ्यांसमोर पूल वाहून गेले, रस्ते बंद झाले आता नागपूरचे घर पुन्हा कसे गाठायचे, या भीतीने जिवाचा थरकाप उडाला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीमुळे अखेर संकटातून बाहेर पडून आम्ही सुखरूप नागपूरला परतलो, अशी त्या भीषण रात्रीची आठवण पर्यटकांनी सांगितली.