Devendra Fadnavis : नवे हवाई वाहतूक धोरण कार्गोहबसाठी अनुकूल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीस; ‘मिहान’ येथील हेलिकॅाप्टर देखभाल, दुरुस्ती केंद्राचे उद्‍घाटन
new air transport policy cargohub dcm devendra fadnvis mihan helicopter inauguration
new air transport policy cargohub dcm devendra fadnvis mihan helicopter inaugurationSakal

नागपूर : राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहेत. राज्याच्या हवाई वाहतुकीसाठी ही एक नवी सुरुवात असेल. तसेच नागपुरातील आंतरराष्ट्रीय कार्गो हबसाठी अनुकूल हवाई वाहतूक धोरण प्रत्यक्षात साकारण्यास हे केंद्र सहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

भारतातील हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्ती व तपासणीसाठी (एमआरओ) एअरबस हेलिकॉप्टर्स आणि इंडामेर यांच्यात झालेल्या करारानुसार मिहान येथील एमआरओ केंद्राच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल,

एअरबस हेलिकॉप्टरच्या ग्राहक सहाय्य सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप, इंडामेर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय पटेल, एअरबस भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड आणि एअरबस भारत व दक्षिण आशियाच्या हेलिकॉप्टर विभागाचे प्रमुख सनी गुगलानी उपस्थित होते.

new air transport policy cargohub dcm devendra fadnvis mihan helicopter inauguration
Winter Session 2023 : मदतीच्या केवळ घोषणाच; अतिवृष्टी, पावसाचा खंड, विमा अग्रिम व अनुदान रखडलेलेच

फडणवीस म्हणाले, जगात हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा, पर्यटन, कायदा व सुव्यवस्था या बाबींसाठी होत आहे. राज्याच्या नवीन वाहतूक धोरणात एमआरओ, विमानतळांच्या धर्तीवर हेलिपॅडची निर्मिती या बाबींचा अंतर्भाव राहील. केंद्र सरकारचा हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.

यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहे. अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत. देशातील देखभाल, दुरुस्ती व तपासणी सुविधा केंद्राचा (एमआरओ) वस्तू व सेवा कर हा १८ वरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या धोरणामुळे हवाई क्षेत्राशी निगडित अनेक कंपन्या एमआरओ केंद्र सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com