esakal | आता उत्पादन सुरू असतानाच शोधता येणार कारमधील नेमका दोष! कसा तो वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

aplication.

उत्पादन सुरू असताना त्यात कसलीही कमतरता राहू नये, यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. उत्पादनाची गुणवत्ता आणि दर्जा निश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्पादन करताना राहून गेलेला छोटासा दोष विकलेल्या कार परत बोलावण्यास कारणीभूत ठरत असतो.

आता उत्पादन सुरू असतानाच शोधता येणार कारमधील नेमका दोष! कसा तो वाचाच

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : एखाद्या वस्तूचे उत्‍पादन करताना त्यातील विशिष्ट सुट्या भागात (कंपोनन्ट) असलेला दोष हा त्या वस्तूचा दर्जा आणि गुणवत्तेसाठी मारक ठरत असतो. मात्र, उत्पादन सुरू असतानाच दोष शोधून काढत, त्यात सुधारणा केल्यास पुढे होणारे नुकसान टळून वेळेची बचतही होते. असे ‘डिफेक्ट' शोधून काढणारे ‘मशीन व्हिजन' नावाचे भन्नाट अप्लिकेशन तयार करून नागपुरातील पंकज मेहर, सुश्रुत आष्टीकर आणि ओंकार जोशी या तीन युवकांनी ‘स्टार्टअप' क्षेत्रात नवे पाऊल ठेवले आहे.

उत्पादन सुरू असताना त्यात कसलीही कमतरता राहू नये, यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. उत्पादनाची गुणवत्ता आणि दर्जा निश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्पादन करताना राहून गेलेला छोटासा दोष विकलेल्या कार परत बोलावण्यास कारणीभूत ठरत असतो.

हा दोष वेळीच शोधून न काढल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. ते टाळण्यासाठी उत्पादन सुरू असतानाच नेमका दोष शोधण्यात यश आल्यास उत्पादनाची गुणवत्ता आणि दर्जा टिकून राहतो. पंकज मेहर, सुश्रुत आष्टीकर आणि ओंकार जोशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)मदतीने मशिन लर्निंग आणि इमेज प्रोसेसिंग हे तंत्र वापरुन सॉफ्टवेअरच्या मदतीने तत्क्षणी दोष शोधून काढण्याचे तंत्र विकसित केले आहे.

सविस्तर वाचा - हड्डीजोड की कंबरमोड? या गावात घरोघरी आहेत दवाखाने.. पण सत्य मात्र भलतेच...

‘मशीन व्हिजन' या नावाने असलेले तंत्र ऑटोमोबाईल, रिफायनरी आणि विविध उद्योगात वापरता येणे शक्य आहे. सध्या हे अप्लीकेशन महिंद्रा आणि सोलर एक्स्प्लोसिव्हज लिमिटेड या कंपन्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. आज या ‘स्टार्टअप'च्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने नोकरी देणारे उद्योजक म्हणून नावारूपाला आले असून आजच्या तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top