esakal | वर्दीवर लागले 'स्टार'; कडक वर्दीत पाहून बायको-मुलेही खुश, नवनियुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
sakal

बोलून बातमी शोधा

newly appointed sub inspectors are joined today in Nagpur

आज अकरा वाजता पोलिस जिमखान्यात पोहचलो. सहकाऱ्यांनाही अधिकाऱ्यांच्या वर्दीत पाहून अभिमान वाटला. शेवटी तो क्षण आला, ज्याचा आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.

वर्दीवर लागले 'स्टार'; कडक वर्दीत पाहून बायको-मुलेही खुश, नवनियुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली आणि पोलिस जिमखान्यात आमद (उपस्थिती) देण्यासाठी हजर होण्याचे आदेश निघाले. मन भारावून गेले आणि आनंद गगनात मावेनासा झाला. गेल्या काही दिवसांपूर्वीच तयार केलेल्या वर्दीवर दोन ‘स्टार’ लावले आणि आनंदल्या मनाने अंगावर वर्दी चढवली. पोलिस अधिकाऱ्याच्या कडक वर्दीत पाहून बायको-मुलेही खुश झाले. 

आज अकरा वाजता पोलिस जिमखान्यात पोहचलो. सहकाऱ्यांनाही अधिकाऱ्यांच्या वर्दीत पाहून अभिमान वाटला. शेवटी तो क्षण आला, ज्याचा आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी लगेच घोषणा केली आणि आम्ही सनदशिररित्या पोलिस विभागात अधिकारी पदावर रूजू झालो. हे सर्व काही शक्य झाले तर ‘सकाळ’ने दिलेल्या लढ्यामुळे आणि गृहमंत्री साहेबांच्या सकारात्मकतेमुळे. त्यामुळे ‘सकाळ’चे मनापासून आभार, अशी भावना नागपूर शहर पोलिस दलात आज रूजू झालेल्या नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

गेल्या सात वर्षांपासून चातकाप्रमाणे पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या पोलिस हवालदारांंना एकदाची पदोन्नती मिळाली. नागपुरातील तब्बल ४८ हवालदार पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत.‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रकाशित करीत हवालदारांच्या पदोन्नतीचा प्रश्‍न लावून धरला होता. आज गुरूवारी सकाळी अकरा वाजता पोलिस मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या उपस्थितीत आमद देण्याचा कार्यक्रम पार पडला. 

यानंतर प्रत्येक पीएसआयला पोस्टींगबाबत विचारणा करण्यात आली. सर्वांना आपापल्या सोयीने पोस्टींग मागण्याचा पर्याय खुला असल्यामुळे अनेकांनी ‘चॉईस पोस्टींग’ मागितली. डीसीपी राजमाने यांनी अभिलेख तपासून त्यानुसार सर्वांना पदभार सोपवला. आजपासून बदली झालेल्या ठिकाणी नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक रूजू होणार आहेत.

दिवाळीपूर्वीच सणाचा आनंद 

गेल्या सात वर्षांपूर्वी पीएसआयची परीक्षा झाले होते. मात्र अद्याप कर्मचाऱ्याच्याच वर्दीवर ड्युटीवर जात होते. त्यामुळे मुलेसुद्धा बाबा अधिकारी झाले की नाही, असा संशय घ्यायला लागली होती. परंतु आज पतीला पोलिस अधिकाऱ्याच्या कडक वर्दीत बघितले आणि गेल्या सात वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. घरात आनंदाचे वातावरण आहे. आम्ही दिवाळीपूर्वीच सण साजरा करणार आहोत, अशी प्रतिक्रीया नवनियुक्त पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी - मूलबाळ नसल्याने पत्नीने केली आत्महत्या; विरहात पतीनेही लावला गळफास

अधिकारी झालो..जबाबदारी वाढली
पोलिस अधिकारी म्हणून आजपासून रूजू झालो. मोठ्या संघर्षानंतर पीएसआय झालो. पण आता जबाबदारी वाढली आहे. कर्मचारी म्हणून आतापर्यंत दिवस काढले. मात्र आता पोलिस अधिकारी पदावर रूजू होताना जबाबदारी आली आहे. पोलिस खात्याचा मोठा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे अडचण जाणार नाही.
-नवनियुक्त पीएसआय

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top