What did Nitin Gadkari say about petrol vehicles?
esakal
नागपूर, ता. १३ : "वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉल वापराच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. मारुती कंपनीने १०० टक्के इथेनॉलवर चालणारी पहिली गाडी आणली आहे. अन्य मोटारसायकल कंपन्याही लवकरच इथेनॉलवरील तीन, दुचाकी बाजारात आणणार आहेत," अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला.