
सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू शकतील असे लोक समाजात असायला हवेत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं विधान केलंय. लोक प्रशासनात शिस्त कायम राहणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीवर न्यायालयात गेलं पाहिजे. न्यायालयाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त ठेवता येऊ शकते आणि समाजात अशी शिस्त ठेवण्यासाठी न्यायालयात जाणारे लोक असायला हवेत असं नितीन गडकरी म्हणालेत.