
Nitin Gadkari: भारत शुक्रवारी स्वातंत्र्याचं ७९वं वर्ष साजरं करणार आहे. १९४७ मध्ये फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पण ही फाळणी जगातील सर्वात मोठी वेदना आणि स्थलांतर ठरलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी ही अनैसर्गिक होती असं म्हटलंय. अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.