Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Nitin Gadkari Skybus, Sharjah Visit, Future Transport: या तंत्रज्ञानाची शारजामधील uSky केंद्रात पाहणी करण्यात आली. स्कायबस उंच मार्गावरून धावणाऱ्या विद्युत वाहनांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्याचा पर्याय म्हणून चर्चेत आहे
Nitin Gadkari explores Skybus technology during his Sharjah visit

Nitin Gadkari explores Skybus technology during his Sharjah visit

esakal

Updated on: 

नागपूर, : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्त अरब अमिरातीतील शारजा शहराच्या दौऱ्यादरम्यान ‘युस्काय ट्रान्सपोर्ट’ कंपनीला भेट देत या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. स्वतः त्यांनी स्कायबसमधून प्रवासही केला. शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी, प्रवासासाठी लागणारा वेळ आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी भविष्यात हवेतून धावणारी ‘स्कायबस’ उत्तम पर्याय ठरू शकतो. या कंपनीत स्वयंचलित विद्युत प्रणालीच्या साहाय्याने प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्याच्या वरून वाहतूक केली जाते.

जमिनीवरील रस्त्यांचा वापर न करता उंच मार्गावरून प्रवास करण्याची ही संकल्पना आहे. या तंत्रज्ञानामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच प्रवासाचा वेळ व मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. या तंत्रज्ञानाविषयी गडकरी म्हणाले की, वाहतूक क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आधुनिक विद्युत वाहतूक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे

. हे भविष्यातील तंत्रज्ञान असून, लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मोठी लोकसंख्या असलेल्या देशांसाठी हे तंत्रज्ञान किफायतशीर ठरू शकेल, असे त्यांनी सांगितले. दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये अशा पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची शक्यता तपासता येऊ शकते. रस्ते बांधणीपलीकडे जाऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने अशा तंत्रज्ञानाला महत्त्व आहे. हवेतून धावणाऱ्या बससारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.

‘स्कायबस’ची कार्यपद्धती उंच ट्रॅकवर प्रवास : जमिनीपासून उंच उभारलेल्या विशेष ट्रॅकवर स्कायबस धावते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीपासून तिचा मार्ग स्वतंत्र राहतो. इलेक्ट्रिक पॉड : स्कायबसला विद्युत मोटर असते. स्टीलच्या चाकांच्या मदतीने पॉड ट्रॅकवर पुढे सरकतो. प्रवासी व मालवाहतूक : या प्रणालीत प्रवाशांसाठी तसेच मालवाहतुकीसाठी स्वतंत्र पॉड वापरता येतात. वाहतूक कोंडीला पर्याय : जमिनीवरील रस्त्यांऐवजी उंच मार्गाचा वापर होत असल्याने विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणि प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com