आशिया खंडातील मोठ्या बाजारात ना मास्क ना सोशल डिस्टसिंग, कोरोनाला खुले आमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

आशिया खंडातील मोठ्या बाजारात ना मास्क ना सोशल डिस्टसिंग, कोरोनाला खुले आमंत्रण

नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठा बाजार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कळमना येथील पं.जवाहरलाल नेहरू बाजारात ग्राहक आणि विक्रेत्यांची प्रचंड गर्दी होत आहे. बाजारात परिसरात ना मास्क लावले जाते आणि नाही सोशल डिस्टसिंग पाळल्या जाते. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना येथे दिवसाढवळ्या नियमांची पायमल्ली करण्यात येत असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

हेही वाचा: कट्टर विरोधकांनाही गडकरींनी पाडली भूरळ, नाना पटोलेंच्या सोशल मीडिया ग्रुपवरही कौतुक

सध्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेत तर गल्लोगल्ली रुग्ण निघत आहेत. एवढेच नव्हे तर जिल्ह्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. लोकांच्या मनात भीतीचे काहूर माजले असताना नागपूरच्या कळमना बाजारात मात्र बिनधास्तपणा जाणवत आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात देशातील व्यापारी आणि विक्रेते येथे व्यापारासाठी येतात. कोट्यवधींची उलाढाल येथे एकाच दिवशी होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मालासोबत लोकही मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, कोरोना काळात येथे कोणतेही नियम पाळल्या जात नाही, असे चित्र येथे दररोज पाहायला मिळते. यावर कोणाचाही अंकुश नसल्यानेच हा प्रकार घडत आहे.

बाजारात गर्दी; कोरोनाचे हॉटस्पॉट -

कोरोनामध्ये लॉकडाउन सुरू आहे. फळबाजार असो की भाजीपाला बाजार असे येथे प्रचंड गर्दी असते. सकाळी पाच वाजतापासून भाजीपाला बाजारात गर्दी होते.पाच हजारांवर विक्रेते आणि ग्राहक येथे येतात. बाजारात भाजीपाला घेण्यासाठी नागपूर शहर नाही तर बाहेर जिल्ह्यातील भाजीपाला विक्रेते येतात. कोरोनाचा काळ असल्याने सोशल डिस्टस्टिंग पाळले जाणे अपेक्षित आहे. मास्क बांधण्याची सक्ती असताना बहुतांश लोक बांधत नाही. तोच प्रकार फळबाजारातही दिसून येतो. फळबाजारातील चबुतऱ्यावर फळे ठेवण्यात येतात. तेथे पाय ठेवायला जागा नसते. अशात ग्राहकांची प्रचंड गर्दी, त्यातही सेनिटायजर वापर करण्यात येत नाही. त्यामुळे कोरोनाचे पसरविण्याचे हॉटस्पॉट असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: दिल्लीपासून गल्लीपर्यंत लस वाटपात भेदभाव; विशिष्ट केंद्राला सर्वाधिक पुरवठा

घाणीचे साम्राज्य

बाजारातील चबुतरे आणि त्यावर असलेली घाण रोगराईचे उगमस्थान आहे. वाहनातून माल उतरविल्यानंतर तो चबुतऱ्यावर ठेवण्यात येतो. मात्र, त्याच्यासोबत आलेला कचरा बाजूला रस्त्यावर टाकण्यात येतो. यात सडलेल्या मालाचा समावेश असतो. सडलेला माल रस्त्‍यावर फेकल्यानंतर त्यावरून वाहने गेली तो पूर्णपणे त्याच ठिकाणी पसरतो. त्याचा कुबट वास येतो. तो वास आरोग्यास अपायकारक आहे. यातून आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येते.

बाजार परिसरात पालिकेचे आरटीपीसीआर सेंटर आहेत. येणाऱ्यांना टेस्टिंग करण्याचे सांगितले. तसेच विविध बाजारांच्या वेगवेगळ्या वेळा दिल्या आहेत. येथे दररोज २० हजारांपेक्षा अधिक लोक येतात. येथील व्यवस्थेकडे आमचे लक्ष आहे.
-राजेश भुसारी, प्रशासक, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर

Web Title: No Mask No Social Distancing In Kalmana Market In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur
go to top