लशींचा पुन्हा ठणठणाट, महापालिकेच्या सर्वच केंद्रांवर लसीकरण बंद

vaccine
vaccineesakal

नागपूर : अठरा वर्षांखालील तरुणाईच्या लसीकरणाला (nagpur corona vaccination drive) बुधवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विक्रमी २३ हजारांवर नागरिकांनी लस घेतली. दुसऱ्या दिवशी २० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. परंतु, आज शुक्रवारी महापालिकेच्या (nagpur municipal corporation) सर्वच केंद्रावर (vaccination center) लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण होणार नाही. केवळ तीन शासकीय केंद्रांवरच लसीकरण सुरू राहणार आहे. त्यामुळे विक्रमी लसीकरणानंतर पुन्हा एकदा लसटंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. (no vaccination on nagpur municipal corporation election due to lack of vaccine)

vaccine
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सज्जतेचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरात महानगरपालिकेतर्फे बुधवारपासून १८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मनपा व शासकीय रुग्णालयाच्या १०६ केंद्रांवर दोन दिवसांत ४३ हजारांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना राज्य सरकारकडून कोव्हीशिल्ड लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने पुन्हा लसीकरणाला ब्रेक लागला आहे. लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर शुक्रवारी (२५ जून) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. शुक्रवारी १८ वर्षावरील सर्व वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लस फक्त डागा रुग्णालय, मेयो व एम्समध्ये उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी नमुद केले. ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लस मेडिकल, सिद्धार्थनगरातील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, आशिनगर झोन मागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय व महाल येथील महाल रोग निदान केंद्रात उपलब्ध आहे. १८ ते ४४ वयोगटातील पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनाच दुसरा डोज देण्यात येत आहे. मेडीकल व महाल रोग निदान केंद्रात कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. दोन दिवस उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उद्या लसीकरण होणार नसल्याने तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.

दोन दिवसांत लस घेणारे नागरिक -

  • बुधवारी - २३ हजार ७०३

  • गुरुवारी - २० हजार २५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com