कोरोनामुळे वर्षभरात एकही नेत्रदान नाही, शंभरावर नागरिक दृष्टीपासून वंचित

eye donation
eye donatione sakal

नागपूर : कोरोना संक्रमित (corona pandemic) व्यक्तीच्या संपर्कात कोणीही येऊ नये म्हणून आणीबाणी, लॉकडाउन (lockdown), संचारबंदी, कर्फ्यू लावले गेले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारातही स्पर्श टाळला गेला. यामुळे नेत्रदानही (eye donation stop in corona) थांबले. दरवर्षी नागपुरात शंभरावर दृष्टीहीन व्यक्तीचे अंधत्व दूर होते. दानात मिळालेल्या नेत्रगोलातून दृष्टिहीनांच्या डोळ्यांत उजेड पेरला जातो. परंतु, कोरोनाने यावर अंकुश आणला. वर्षभरात एकही नेत्रदान झाले नाही. (not single eye donation in one year due to corona)

eye donation
खेळता खेळता बालक पडला बोअरवेलमध्ये अन् पुढे?

भारतात सुमारे पावणेदोन कोटी दृष्टीहीन आहेत. त्यापैकी ५५ टक्के अंधत्व केवळ मोतीबिंदूमुळे आलेले असते. तर, यांना बुबूळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते. देशात ५२ हजारांवर नेत्रगोल दानातून जमा होतात. २०१९ मध्ये २८ हजार व्यक्तींमधील अंधत्व दूर करण्यात यश आले. मात्र, यावर्षी कोरोनाच्या आणीबाणीमुळे लॉकडाउन झाले. लॉकडाउनच्या काळात मार्च २०२० पासून उपराजधानीच्या शहरातच नव्हे, तर राज्यातही नेत्रदानावर अलिखित अंकुश आला. एकाही अंध व्यक्तीच्या डोळ्यांत उजेड पेरता आला नाही.

दरवर्षी देशात २ लाख नेत्रगोलांची गरज आहे. मात्र, यापैकी केवळ २५ ते २८ हजार दृष्टिहीनांच्या डोळ्यांत उजेड पेरता येतो. मार्च २०२० ते जून २०२१ या काळात पंधरा महिन्यांच्या काळात एकही बुबूळ नेत्रदानातून मिळाले नाही. यामुळे आपोआपच नेत्रदानाच्या मोहिमेला खीळ बसली.

नागपुरातील नेत्रदान -

दरवर्षी देशात ३५ ते ४० हजार नवीन अंधांची भर पडते. हे प्रमाण चिंताजनक आहे. एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांचा लाभ दोन अंधांना होतो. नागपुरातही चार हजारांवर अंध नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत. बुबूळरोपण, तिरळेपणा, काचबिंदू या अंधत्वाच्या कारणांवरही मेडिकलच्या नेत्र विभागातून काम होते. २०१८-१९ मध्ये नागपूर जिल्ह्यात यावर्षी ४९६ व्यक्तींचे नेत्रदान झाले. यापैकी १४४ दृष्टीहीन बांधवांच्या डोळ्यांत उजेड पेरण्यात आला होता. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात ८१ नेत्रगोल मिळाले. त्यात ६५ व्यक्तींच्या काळोख दाटलेल्या डोळ्यांना नजर आली आहे. २०१९ ते फेब्रुवारी २० या काळात अवघे नागपुरात ८० जणांच्या डोळ्यांत उजेड पेरता आला. मात्र, २०२०-२०२१ या काळात एकही नेत्रगोल प्राप्त झाला नाही. तर बुबूळ प्रत्यारोपणही झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com