esakal | कुख्यात गुंडाचा १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आई-वडिलांसह भावाला ठार मारण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

कुख्यात गुंडाचा १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नराधमास अटक

कुख्यात गुंडाचा १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नराधमास अटक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : हत्याकांडासह गंभीर स्वरूपाचे अर्धा डझन गुन्हे दाखल असलेल्या एका कुख्यात गुंडाने शेजारी राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार (Rape) केला. पोलिसात तक्रार केल्यास आई-वडिलांसह भावाला ठार मारण्याची धमकी (Death threats) दिली. ही घटना पारडी परिसरात उघडकीस आली. मयूर मुन्नेश्वर नागदेवे असे कुख्यात गुंडाचे नाव आहे. (Notorious gangster tortures 15 year-old girl)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) हिच्या आईवडिलांचे पारडी हद्दीत चहाची टपरी आहे. तिचा एक भाऊ चारचाकी वाहन चालवितो तर एक भाऊ दुकानात आईवडिलांना मदत करतो. त्यामुळे रिया ही घरीच एकटी राहते. ती दहावीत शिकते. तिच्या परिसरात कुख्यात गुंड मयूर नागदेवे हा राहतो. त्याच्यावर खून, घरफोडी, अपहरण करून खंडणी मागणे, वाहनचोरी, घरफोडी आणि शस्त्र बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी : तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करूण अंत

त्याची नजर रियावर होती. त्यामुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागे लागला होता. त्याने अनेकदा तिला रस्त्यात अडविणे, तिच्याशी छेडखानी करणे किंवा तिच्यावर शेरेबाजी करणे असे प्रकार तो करीत होता. मात्र, त्याची वस्तीत दादागिरी असल्यामुळे रिया दहशतीत होती. १२ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास रिया घरात एकटी असताना मयूर नागदेवे घरात घुसला. त्याने तिला प्रेम करीत असल्याचे सांगून शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच मयूरने तिच्यावर जबरीने बलात्कार केला. मयूर हा गुंडप्रवृत्तीचा आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याच्या भितीपोटी मुलीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे मयूरची हिंमत वाढली.

हेही वाचा: सफेलकरच्या आणखी एका साथिदाराला अटक; २८ पर्यंत पोलिस कोठडी

आईला दिसला नको त्या अवस्थेत

रियाला धमकी दिल्याने तिने कुणालाही सांगितले नाही. हीच संधी साधून तो सोमवारी देखील वॉलकंपाऊंडवरून उडी मारून तिच्या घरात प्रवेश केला. तिला पुन्हा धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिच्या घरातच झोपला. त्याचवेळी मुलीची आई घरी आली. मयूरला घरात नको त्या अवस्थेत पाहून तिचा पारा चढला. आईने त्याला दोन थापड्या मारल्या. मुलीला घेऊन तिची आई पारडी पोलिस ठाण्यात गेली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून एका तासातच मयूर यास अटक केली.

(Notorious gangster tortures 15 year-old girl)