esakal | अंत्यसंस्कारासाठी महापालिका देणार मोफत लाकडे; फक्त कोरोनाने मृतपावलेल्यांसाठी सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

अंत्यसंस्कारासाठी महापालिका देणार मोफत लाकडे; फक्त कोरोनाने मृतपावलेल्यांसाठी सुविधा

अंत्यसंस्कारासाठी महापालिका देणार मोफत लाकडे; फक्त कोरोनाने मृतपावलेल्यांसाठी सुविधा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः कोरोनाने मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने स्मशान घाटांवर मोफत लाकडे देण्याची घोषणा केली. ही सुविधा शहरातील फक्त सहा घाटांवर उपलब्ध राहणार आहे. मोफत लाकडे द्यावे याकरिता शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता.

हेही वाचा: मेळघाट बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; जिल्हापरिषदेकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

घाटांवर अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये घेतल्या जात असल्याचा आरोप केला जात होता. मानेवाडा घाटावर शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी भेट दिली असताना मृतकांच्या कुटुंबीयांनी लाकडांसाठी वसूल करण्यात आलेल्या पैशाची पावती त्यांना दाखवली.

त्याच व्हीडीओसुद्धा शिवसेनेच्यावतीने व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी, शहर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाचे उपायुक्त प्रदीप दासरवार यांना निवेदन दिले.

अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेने आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन महापालिकेच्यावतीने आदेश काढून स्मशान घाटांवर करोनाने मृत पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा: के.टी. नगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू; सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होणार लाभ

येथे मिळेल मोफत लाकडे

सहकारनगर, गंगाबाई घाट, मोक्ष धाम, अंबाझरी, मानेवाडा आणि मानकापूर घाटांवर मोफत लाकडे दिली जाणार आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top