
नागपूर : शहरी आण ग्रामीण भागात हातपाय पसरणाऱ्या कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. मागील २४ तासांत नागपुरात ३२ मृत्यू झाले. यामुळे एप्रिल ते जुलै या पाच महिन्यात बळींची संख्या एक हजार पार गेली आहे. तर १३१३ बाधितांची नव्याने भर पडल्याने आकडा २८ हजार पार गेला आहे. यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले असून ही बाब चिंता वाढवणारी ठरत आहे. नागपुरातील एक हजारावर मृतांमध्ये ७६५ मृत्यू शहरातील, तर ग्रामीण भागातील १४९ मृत्यूंची नोंद आरोग्य विभागात आहे.
रविवारी मेडिकलमध्ये १४ तर मेयोत १३ जण दगावले. तर ५ जण खासगी रुग्णालयात दगावले. या दगावलेल्यांमध्ये ३२ कोरोनाबाधितांमध्ये शहरी भागातील २३ जणांचा तर ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश आहे. तर जिल्हाबाहेरील उपचारासाठी दाखल असलेल्या २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूंची संख्या १०११ वर पोहचली आहे. नागपुरात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये मेडिकलमधील ४८६ तर मेयोत ४२४ मृत्यूंची नोंद झाली आहे.
खासगी रुग्णालयांत कोरोना बळीची संख्या १०० नोंदविली आहे. सर्वाधिक मृत्यू मेडिकलमध्ये झाले आहेत. त्या पाठोपाठ मेयो रुग्णालयांत झाले आहेत. नवीन १ हजार ३१३ कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे नागपुरात बाधितांची एकूण संख्या तब्बल २८ हजार ३२८ वर पोहचली आहे. त्यातील सर्वाधिक २१ हजार ८४३ बाधित शहरी भागातील रुग्ण आहेत. तर ६ हजार २०६ रुग्ण ग्रामीण नागपुरातील आहेत. २७९ रुग्ण जिल्ह््याबाहेरील येथील रुग्णालयांत उपचाराला आलेले आहेत.
रविवारी दिवसभरात १ हजार ५४ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे नागपूर जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या १८ हजार २१ वर पोहचली आहे. यापैकी १३ हजार ४६६ कोरोनामुक्त शहरी भागातील आहेत. तर ४ हजार ५५५ कोरनामुक्त हे ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय ५ हजार ८९४ सक्रिय कोरोनाबाधित घरी विलगिकरणात आहेत. तर येथील शहरी भागातील ७ हजार १५५ आणि ग्रामीण भागातील २ हजार १४१ असे एकूण ९ हजार २९६ सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण मेयो, मेडिकलसह खासगी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.