
International Nurses Day : रुग्णांची अविरत सेवा करूनही तुटपुंजा पगार; परिचारिकांची व्यथा
अचलपूर (जि. अमरावती) : खासगी रुग्णालय असो की सरकारी परिचारिकांचे (Nurses) जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये (Private covid Hospital) तर अद्यापही किमान वेतन कायदा (Minimum wage law) लागू झाला नसल्याने तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करीत असल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन कोरोनाच्या संकटात (Coronavirus) किमान वेतन कायदा लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Nurses got very minimum salaries in Amravati)
हेही वाचा: तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि टॉप मायलेज देणाऱ्या 'या' आहेत तीन बाईक्स; जाणून घ्या
परिचारिकांना कायद्याचे संरक्षण नाही, नोंदणीकृत अर्हता नसल्याने त्यांना इतरांप्रमाणे मानसन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कम्पाउंडर, कधी कधी रुग्णांकडूनही त्रासाला त्यांना सामोर जावे लागते. एकूणच रुग्णसेवेला सुखापेक्षा दु:खच अधिक असल्याचे चित्र शहरासह राज्यभरात आहे. आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे रोजी जन्मदिन. त्यांचा जन्मदिन हा जागतिक परिचारिकादिन म्हणून दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात साजरा केला जातो.
परंतु आजही खासगी परिचारिकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नसल्याचे वास्तव आहे. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरक्षित उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे, स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रुग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणाऱ्या रुग्णांची शुश्रूषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे विशेषत: काही खासगी रुग्णालयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार खासगी रुग्णालयातील परिचारिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
हेही वाचा: धक्कादायक! मृत व्यक्तीच्या नावाने धान्याची उचल? रास्त धान्य दुकानदाराचा काळाबाजार
शहरातील रुग्णालयात परिचारिका किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात काम करीत आहेत. कायद्याचे संरक्षण नसल्याने अपमानाचे डोंगरच घेऊन त्या जगत आहेत. ग्रामीण भागात तर त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जात आहे. तरीही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत आहेत.
(Nurses got very minimum salaries in Amravati)
Web Title: Nurses Gotvery Minimum Salaries In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..