Nagpur News : भीतीमुळे नर्सिंग विद्यार्थिनींनी सोडले वसतिगृह

९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडून घरी गेल्या. अखेर महाविद्यालय प्रशासनाने उन्हाळी रजा जाहीर केल्याची माहिती पुढे आली आहे.
nursing students left the hostel due to fear nagpur
nursing students left the hostel due to fear nagpurSakal

नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजमधील ऋतुजा बागडे (१९) या विद्यार्थिनीने बुधवारी वसतिगृहात आत्महत्या केली. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी घाबरले आहेत. ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडून घरी गेल्या. अखेर महाविद्यालय प्रशासनाने उन्हाळी रजा जाहीर केल्याची माहिती पुढे आली आहे.

भंडारा येथील रहिवासी ऋतुजा मेडिकलमधील बी. एस्सी. नर्सिंगला होती. येथील वसतिगृहात बुधवारी सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला. यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले.

विद्यार्थिनीचे पार्थिव शवविच्छेदनानंतर बुधवारी घरी भंडारा येथे पाठविल्यावर वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सुट्टी मागून घरी परतणे सुरू केले. गुरुवारी सकाळपर्यंत ९० टक्के विद्यार्थी वसतिगृह सोडून घरी गेले.

शेवटी बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची नियमावली तपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या.

एकटेपणा जाणवत असल्याची तक्रार

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या एक खोलीसह ती अभ्यास करत असलेल्या वसतिगृहातील तिच्या मैत्रिणीच्या दुसऱ्या खोलीला कुलूप बंद करण्यात आले. वसतिगृहाच्या दोन्ही खोल्या प्रशासनाने पोलिसांच्या सूचनेवरून कुलूप बंद केल्या आहेत.

येथील मोबाईलसह तिच्या पुस्तकांचीही पोलिसांकडून सखोल तपासणी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे प्राथमिक तपासणीत पुढे आले. ऋतुजा अभ्यासात हुशार होती.

वसतिगृहातील काही विद्यार्थिनींसोबत अधून मधून चांगला संवादही साधत होती. एक-दोन दिवसांपूर्वी एकटे वाटत असल्याचे बोलून दाखवले होते. त्यामुळे या संवादाचा या घटनेशी काही संबंध आहे काय? हे ही पोलिसांकडून तपासले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com