ओबीसींना आरक्षण निश्चित मिळेल

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा विश्वास
Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbalsakal

नागपूर - आगामी महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण निश्चित मिळेल, असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तसेच ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी ते शुक्रवारी नागपूरला आले होते. नागपूर विमानतळावर बोलताना भुजबळ म्हणाले, राज्य निवडणूक आयोग आपले काम करीत असतो. निवडणुकीसाठी पूर्व तयारी करणे हे त्यांचे कामच आहे. याचा अर्थ निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असे होत नाही. आम्हाला खात्री आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ओबीसींना आरक्षण मिळेल. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने भरपूर प्रयत्न केले.

सरकारने बांठिया आयोगाचे काम सुरू असून स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी इम्पेरिकल डेटा सादर केल्या जाईल. वेगाने हे काम होत असून ओबीसींना न्याय मिळेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षणही रद्द केले होते. परंतु, शिवराजसिंह चौहान सरकारने तातडीने नव्याने सर्वेक्षण करून अहवाल न्यायालयात सादर केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षणही बहाल केले आहे.

देशाची नव्हे भाजपची चूक

भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्त्याव्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, ही आपल्या देशाची चूक नाही तर भाजपच्या ज्या प्रवक्त्यांनी वक्तव्य केले त्यांची आहे. शर्मा यांचे व्यक्तव्य अत्यंत पोरकटपणाचे आहे. कुणाच्याही धर्मावर वा धर्मगुरुवर टीका अयोग्य आहे. भाजपने नूपुर शर्मा आणि आणखी एका प्रवक्त्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता भारतातील मुस्लिम असो वा हिंदू दोन्ही समाजाने संयम पाळण्याची आवश्यकता असल्याचा सल्लाही यावेळी भुजबळ यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com