कार्यादेश झालेल्या फाईल्सची होळी करायची का? स्थायी समिती सदस्य संतप्त; आयुक्त न आल्याने बैठकच रद्द

Officers in Nagpur NMC are angry over files
Officers in Nagpur NMC are angry over files

नागपूर ः विकास कामे रोखल्याने जाब विचारण्यासाठी उत्सुक असलेल्या स्थायी समिती सदस्यांनी आज आयुक्त बैठकीत न आल्याने बैठकच रद्द केली. सभागृहात कार्यादेश झालेली विकास कामे सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाही फाईल्स प्रलंबित आहेत. आता या फाईल्सची होळी करायची काय? असा संतप्त सवाल स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित करीत आयुक्त येईल, तेव्हाच बैठक होईल, अशी भूमिका घेतली.

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रशासनाने अनेक प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठविले होते. परंतु बैठक सुरू होताच मागील २०१९-२० या वर्षातील कार्यादेश झालेली कामे का सुरू करण्यात आली नाही? तसेच याबाबत जूनमध्ये सभागृहात महापौर संदीप जोशी यांनी यांनी दिलेले आदेश का पाळले नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती सदस्यांनी केली. 

एवढेच यंदा अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेली कामे दोन महिने होऊनही का सुरू करण्यात आले नाही? असाही प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यावर प्रशासनाकडून उपस्थित असलेल्या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांनी यावर उत्तर देण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांंनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. शहरातील विकास कामांवर प्रशासन ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत प्रशासनाचा एकही प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी स्थायी समितीने घेतली. 

आयुक्तांना बैठकीबाबत पत्र देण्यात आले होते. परंतु प्रशासकीय कामानिमित्त ते मुंबईला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्थायी समितीची आजची बैठक रद्द करण्यात आली असून उद्या आयुक्तांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. या बैठकीत आयुक्तांना जाब विचारला जाणार असल्याचे ते म्हणाले.

या वर्षात एकही कार्यादेश नाही

मागील वर्षी कार्यादेश झालेली कामे रोखलीच, परंतु या वर्षात एकही नवीन कार्यादेश देण्यात आले नाही. केवळ राज्य सरकारकडून आलेल्या एसडीआरएफच्या निधीचे कार्यादेश निघाले. शहराला विकासापासून दूर रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप झलके यांनी यावेळी केला.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com