अठ्ठेचाळीस दिवसांनी झाला आजोबांचा ‘पुनर्जन्म’

The old man returned home after fortyeight days
The old man returned home after fortyeight days

बुटीबोरी (जि. नागपूर) : कौटुंबिक वादातून घरातून निघून गेलेल्या आजोबाची तब्बल ४८ दिवसांनी बुटीबोरीमधील ‘पुनर्जन्म’ आश्रममध्ये परिवाराची भेट घडविली.

सदानंद राघोबा गावंडे (वय ६५, रा. आडका, ता. कामठी) येथील हे वृध्द १३ ऑक्टोबर २०२० ला घरगुती वादातून राहत्या घरातून निघून गेले. कुठे जायचे, काय करायचे आहे, हे त्यांना माहीत नव्हते. ते पायदळ चालत बुटीबोरी येथील ‘मामा का ढाबा’ या हॉटेलपर्यंत येऊन पोहोचले. ढाब्याचे मालक अनिल हांडे यांनी त्यांना थोडे खायला दिले. त्यांना बसविले व त्यांची विचारपूस केली.

सदानंदजीची संपूर्ण माहिती मिळताच अनिल हांडे यांनी बुटीबोरी परिसरातील साथ फाउंडेशनचे संस्थापक प्रयाग डोंगरे याना सदानंदजीची सर्व माहिती दिली. ही व्यक्ती नैराश्यातून काहीही कमी जास्त करू नयेकरिता साथ फाउंडेशनच्या माध्यमातून निराधार लोकांचे पुनर्वसन करणाऱ्या पुनर्जन्म आश्रममध्ये आश्रय दिला. ४८ दिवसांनंतर फेसबुकच्या माध्यमातून सदानंदजी गावंडे यांच्या परिवाराची माहिती घेऊन त्यांच्या परिवाराशी संपर्क साधण्यात आला.

२९ नोव्हेंबरला त्यांच्या राहत्या घरी साथ फाउंडेशनच्या माध्यमातून सदानंदजी यांच्या परिवाराशी भेट घालून दिली. गावंडे यांना घरापर्यंत नेऊन दिल्यानंतर परिवार व ग्रामवासींकडून साथ फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक केले व त्यांचे आभार व्यक्त केले.

याक्षणी साथ फाउंडेशनचे संस्थापक प्रयाग डोंगरे, परितोष रेंगे, अक्षय बहादुरे, परीक्षित रेंगे, सदानंद गावंडे यांचा मुलगा रमेश गावंडे, बबन गावंडे, ग्रामवासी पुरुषोत्तम मानमोडे, वामन खंगारे, मंगेश मानमोडे उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com