One Day Old Baby Stolen from Daga Hospital Woman in Burqa Suspected
sakal
नागपूर - तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डागा रुग्णालयातून एक दिवसाचे बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२१) दुपारी बारा वाजताच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी एका अज्ञात बुरखा घातलेल्या संशयीत महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.