esakal | नागपुरात आरटीईच्या जागांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त घट, ६९० शाळांमध्ये फक्त ५,७२९ जागा

बोलून बातमी शोधा

only 5729 seats in 690 school under RTE in nagpur

राज्यात आरटीईच्या १ लाख ९२० जागा आहेत. त्यासाठी १५ हजारांवर शाळांची दरवर्षी नोंदणी करण्यात येते. मात्र, यावर्षी राज्यात केवळ ९ हजार ९९ शाळांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शाळांमध्ये ९४ हजार १२४ जागांचा समावेश आहे. 

नागपुरात आरटीईच्या जागांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त घट, ६९० शाळांमध्ये फक्त ५,७२९ जागा
sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात आरटीईच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू आहे. यासाठी शहरातून ६८० शाळांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये ५ हजार ७२९ जागांचा समावेश आहे. मात्र, गत वर्षीच्या तुलनेत शाळांमध्ये वाढ झाली असताना १ हजार ५१ जागा कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - ब्लूटूथ-मायक्रोफोन वापरून दिली परीक्षा अन् मुन्नाभाई आला टॉपर, एका पेपरसाठी घ्यायचा ४ लाख

राज्यात आरटीईच्या १ लाख ९२० जागा आहेत. त्यासाठी १५ हजारांवर शाळांची दरवर्षी नोंदणी करण्यात येते. मात्र, यावर्षी राज्यात केवळ ९ हजार ९९ शाळांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शाळांमध्ये ९४ हजार १२४ जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी जागांमध्ये वाढ होत असते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निम्म्या जागांचा समावेश आहे. नागपूरमधून ६ हजार ७८० जागांवर गेल्या वर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी ३१ हजारांवर पालकांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५ हजार ९९६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. 

यावर्षी जानेवारीत शाळांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये ६८० शाळांनी नागपूर शहरातून नोंदणी केली. त्यामध्ये ५ हजार ७२९ जागांचा समावेश करण्यात आला. मात्र, गेल्या वर्षी ६ हजार ७८० जागा असताना या वर्षी एक हजाराने जागा घटल्या कशा, हे कोडेच आहे. 

हेही वाचा - मार्च महिन्यातच पारा वरचढ, कूलरही निघाले बाहेर; जलवाहिनी नसलेल्या भागात वाढतेय समस्या

कोरोनाचा फटका -
मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रवेशास सुरुवात करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे ७८४ जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, या वर्षी त्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. यानंतरही परिस्थिती उलट असल्याचे दिसून येते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे इंग्रजी शाळांच्या प्रवेशावर परिणाम झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.