
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही; यशोमती ठाकूर यांचा इशारा
अमरावती : रेमडेसिव्हिरचा (Remdesivir Available) काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. साथीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. याचप्रकारे यापुढेही कोरोना उपचारासंदर्भातील कोणतीही औषधे, इंजेक्शन याचा काळाबाजार (Blackmarket of drugs) कुठेही होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी दिले. (minister Yashomati Thakur warned people doing blackmarket of medicines)
हेही वाचा: कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत
जिल्ह्यात कोरोना उपचारासाठीच्या सर्व आवश्यक औषधे, इंजेक्शन व सामग्रीचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार वापर होण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी यापूर्वी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या औषधे व सामग्रीचे दर शासनाकडून निश्चित झाले असून, आरटीपीसीआर, रॅपिड ऍन्टिजेन, ऍन्टी बॉडीज, एचआरसीटी चाचण्यांसाठीचे दरही निश्चित केले आहेत.
रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथकेही स्थापित करण्यात आली आहेत. या काळात आरोग्य, पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे प्रशासन आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गरजू नागरिकांना योग्य दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सामान्य नागरिकांकडून जादा दर उकळणे व इतरही नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा: नागपुरातील प्रत्येक तालुक्यात लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर; जिल्हा परिषदेचा निर्णय
गरजू रुग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत, या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. अशा काळात जर कुणी व्यक्ती आपले कर्तव्य विसरून रुग्णांची लूट करीत असेल, तर त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. पोलिस, आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी समन्वयाने देखरेख करून कुठेही गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
(minister Yashomati Thakur warned people doing blackmarket of medicines)
Web Title: Minister Yashomati Thakur Warned People Doing Blackmarket Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..