Maharashtra 11th Admissions : अकरावीच्या ५५ हजारांवर जागा रिक्त; आजपासून भरणार वर्ग, केवळ ३५ हजार ६१३ जागांवरच प्रवेश
11th Class Admission: नागपूर जिल्ह्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीअखेर ५५ हजारांवर जागा रिक्त राहिल्या आहेत. आजपासून अकरावीचे वर्ग सुरू होत आहेत.
नागपूर : केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाची चाैथी फेरी पूर्ण झाली असून जिल्ह्यातील ९७ हजार ४३५ जागांपैकी ३५ हजार ६१३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अजूनही जिल्ह्यातील ५५ हजारांच्या जवळपास जागा रिक्त आहेत. सोमवारपासून अकरावीचे वर्ग सुरू होतील.