esakal | दिलासादायक! नागपुरात एकाच दिवशी तब्बल ७ हजार ३४९ जणांची कोरोनावर मात; ७१ जण दगावले

बोलून बातमी शोधा

दिलासादायक! नागपुरात एकाच दिवशी तब्बल ७ हजार ३४९ जणांची कोरोनावर मात
दिलासादायक! नागपुरात एकाच दिवशी तब्बल ७ हजार ३४९ जणांची कोरोनावर मात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः हळूहळू कोरोनाचा विळखा (Coronavirus) आता बऱ्यापैकी सैल झल्याचे दिसून येत आहे. नागपूरची कोरोना परिस्थिती (Nagpur Corona Update) आटोक्यात येत असून जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा बऱ्यापैकी फुगला आहे. विशेष असे की, मृत्यूसंख्ये घट झाली आहे. दिवसभरात ४ हजार १८२ बाधित आढळले. तर तब्बल ७ हजार ३४९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. उपचारादरम्यान जिल्ह्यात ७१ जणांचा कोरोनाने श्वास थांबला. (over seven thousand patients defeat corona in Nagpur today)

हेही वाचा: ‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच

जिल्ह्यात कोरोनाने धुमाकुळ माजवला होता. चक्क कोरोनाबाधितांचा दर काही दिवसांपुर्वी ३२ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र हा बाधितांचा दर आता निम्म्यावर आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने अधिकाधिक चाचण्या वाढवण्यात आल्या. जिल्ह्यात एकाच दिवशी ३० हजार चाचण्या होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढली होता. जिल्ह्यात मंगळवारी १९ हजार ४६८ चाचण्या झाल्या आहेत. यातील ४ हजार १ ८२ रुग्णांना बाधा झाल्याचे पुढे आले. यात शहरातील २ हजार ४९८ तर ग्रामीण भागातील १ हजार ६७४ जण बाधित आढळले आहेत. शहराच्या तुलनेत आता ग्रामीण भागाची स्थिती भयावह आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख २८ हजार ५३९ वर जाऊन पोहचली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात आता बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वास्तव आहे.

मंगळवारी ७ हजार ३४९ जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या ३ लाख ५१ हजार ५९४ वर पोचहली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ८२.०४ टक्क्यांवर आले आहे. तर आज ७१ कोरोना बळींची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ४०, ग्रामीणचे २१ व इतर जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता ७ हजार ७४६ वर आहे.

हेही वाचा: प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाने कोलमडली रुग्णसेवा; मेडिकलच्या ट्रॉमातील कोविड कॅज्युल्टी बंद

जिल्ह्यात ६९ हजार कोरोनाबाधित

आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यामध्ये ७७ हजाराच्या वर कोरोनाबाधितांची संख्या पोहचली होती. मात्र आता सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या घटून ६९ हजार१९९ वर आली आहे. यात शहरातील ३८ हजार ८८४ आहे. तर ग्रामीण भागात ३० हजार ३१५ आहे. सध्ययापैकी केवळ १८.३५ टक्के म्हणजेच १२ हजार ६९८ जणांनाच सौम्य, मध्यम, तीव्र व गंभीर लक्षणे आहेत. त्यांना शासकीय, खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत. तर लक्षणे नसलेले तब्बल ८१.६५ टक्के म्हणजेच ५६ हजार ५०१ जण गृह विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत.

(over seven thousand patients defeat corona in Nagpur today)