Student Corona News | सहा लाखांवर विद्यार्थी अनुपस्थित; संसर्ग कमी न झाल्याने पालक धास्तावलेलेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Over six lakh students absent Parents scared because corona infection not decreased

सहा लाखांवर विद्यार्थी अनुपस्थित; संसर्ग कमी न झाल्याने पालक धास्तावलेलेच

नागपूर : १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होऊन तीन दिवस झाले असताना अजूनही तब्बल ६ लाख १९ हजार विद्यार्थी अनुपस्थित आहे. पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे अनुपस्थितीचे चित्र जास्त असल्याचे दिसते.

हेही वाचा: भाजप आणि आरएसएस एकदम पुरोगामी : अमृता फडणवीस

फेब्रुवारी २०२० मध्ये १६ तारखेपासून कोरोना प्रादूर्भाव लक्षात घेत राज्यभरातील शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या कोरोनाच्या लाटेचा प्रकोप ओसरल्यानंतर १४ डिसेंबर २०२० पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. पुन्हा प्रादुर्भाव वाढल्याने ४ जानेवारी २०२१ ला शाळा बंद करण्यात आल्या. दुसऱ्या लाटेचा प्रकोप ओसरल्यानंतर १५ जुलै २०२१ पासून ग्रामीणमधील वर्ग भरू लागले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वर्ग भरण्यास सुरवात झाली. आता ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता ८ जानेवारीपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. रुग्णसंख्या ओसरताच १ फेब्रुवारीपासून शहर व ग्रामीण भागातील इयत्ता पहिले ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील आदेशही मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले. सोबतच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक सूचनांची मोठी यादीही शाळांना दिली होती.

हेही वाचा: NEET परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख जाहीर

शाळा व्यवस्थापनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शक्य त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, आजही जिल्ह्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजाराच्या घरातच असल्याने पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी थोडे घाबरत आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात ४१०२ शाळा आहेत. त्यात ८ लाख ५४ हजार २९१ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी आज ३५२७ शाळा सुरू असून, येथे केवळ २ लाख ३५ हजार २०३ विद्यार्थ्यांची उपस्थिती असून ६ लाख १९ हजार ८८ विद्यार्थी अनुपस्थिती आहेत.

Web Title: Over Six Lakh Student Absent Parents Scared Because Corona Infection Not Decreased

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top