
नागपूर : सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. हाताला काम मिळावे म्हणून जिल्ह्यातील ३ लाख ८८ हजार ५४१ तरुण-तरुणींनी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाकडे नोंदणी केली आहे. मागील दोन महिन्यात आयोजित पाच रोजगार मेळाव्यांमधून १ हजार ६९१ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.