esakal | भीतीमुळे खरंच ऑक्सिजनच्या पातळीत घट होतेय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

बोलून बातमी शोधा

oxygen
भीतीमुळे खरंच ऑक्सिजनच्या पातळीत घट होतेय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भीतीने शरीरातील प्रतिकारशक्ती ४८ तासापासून कमी होते. मनातील भीती गंभीर आजाराला आमंत्रण आहे. भीतीमुळे हृदयाचे ठोके वाढतात त्याचा परिणाम ऑक्सिजनवर होतो. त्यामुळे भीती बाळगणे सोडा, असे आवाहन नागपूर मानसोपचारतज्ज्ञ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे आणि लता मंगेशकर हॉस्पिटलचे मानसोपचार विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधीर भावे यांनी केले.

हेही वाचा: दादागिरी करणाऱ्या दबंग तरूणीचा भर चौकात खून; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

भीतीचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. यापासून दूर राहण्यासाठी चांगली व पुरेशी झोप, सकाळी नियमित व्यायाम, प्राणायाम व योगा, व्यसनांपासून दूर राहणे आणि विवेकी विचार बाळगणे व ते पसरविणे या बाबींचा प्रत्येकाने अंगीकार करून सकारात्मक विचार बाळगा, असे आवाहनही त्यांनी केले. महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने कोविड संवाद’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सोमवारी त्यांनी कोविडची भीती घालविण्याचे उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक वास्तविक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आर्थिक अडचण, कौटुंबिक वाद अशाही समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे काळजी व चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. आपल्या मनातील भीतीचा थेट परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर पडतो. ताण-तणावामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. भीती कमी करण्यासाठी काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावरील संदेशांवर विश्वास ठेवणे सोडा, ते वाचू नका, पसरवू नका. मनावर नियंत्रण ठेवा, आपल्या मनात कुठले विचार येऊ द्यायचे अथवा नाही हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे सकारात्मक रहा, असेही प्रा. डॉ. सुधीर भावे व डॉ.सुशील गावंडे यांनी सांगितले.

हेही वाचा: आजपासून दुपारी १ वाजेनंतर दुकाने, बाजारपेठा बंद; फक्त मेडिकल्स राहतील सुरू

कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के

कोरोना झाला तर मी मरणार ही भावना मनात ठेवण्याऐवजी कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. त्यामुळे मी ९८ टक्के सुरक्षित आहे ही भावना मनात ठेवा. घरात रहा, छंद जोपासा, स्वत:ला गुंतवून ठेवा, असाही सल्ला प्रा. डॉ. सुधीर भावे व डॉ.सुशील गावंडे यांनी दिला.