esakal | कोरोनामुळे छपाई व्यवसायाचा बेरंग, हजारो झालेत बेरोजगार

बोलून बातमी शोधा

Lockdown
कोरोनामुळे छपाई व्यवसायाचा बेरंग, हजारो झालेत बेरोजगार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कागदावर रंगीबेरंगी कलाकृती तयार करून छपाई करणारा व्यवसाय लॉकडाउनमुळे (lockdowon) बेरंग झाला आहे. कोरोनामुळे (corona effect) या व्यवसायातील रंगच हरपल्याचे चित्र आहे. या व्यवसायाला रंगीत ठेवण्यासाठी मदतीची गरज आहे. (people facing unemployment issue due to lockdown)

हेही वाचा: सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

कोरोनामुळे निर्बंध कडक करण्यात आले. यामुळे अनेक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश सरकारने काढले. त्यामुळे अनेक बंद पडले. कोरोनामुळे लोक वस्तूंना स्पर्श करण्याचे टाळत आहे. त्याचा परिणाम छपाई व्यवसायावर झाला. शिवाय सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधाचाही वाईट परिणाम झाला. लग्न, समारंभ, शिबिरही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अशा कार्यक्रमाकरिता पत्रक, बॅनर्स आयोजकांकडून छापण्यात येत होती. त्यामुळे व्यवसाय चालत होता. परंतु, कोरोनामुळे हे सर्व बंद आहेत. त्यामुळे कुणीही आता पत्रक, बॅनर्स छापत नाही. अनेक जण डिजिटल माध्यमांद्वारेच प्रचार प्रसार करीत आहे. परिणामी व्यवसाय ठप्प पडला. या व्यवसायासोबत अनेक रोजगारही अडचणीत आला.

नागपूर व विदर्भातील महत्वाच्या बातम्यांसाठी इथं क्लिक करा...

सिद्धांत कॉम्प्युटर अॅण्ड प्रिंटर्सचे आशिष फुलझेले यांनी सांगितले की, याच वेळेस नाही तर गेल्या वर्षभरापासून काम बंद ठप्प आहे. मध्यंतरीच्या काळात थोडे काम होते. परंतु, आता काहीच नाही. या व्यवसायाशी संबंधित सर्व काम बंद आहे. खासगी ट्यूशन क्लासेस पत्रक, बॅनर्स छापतात. पण ते ही बंद आहे. तीन कर्मचारी आहेत. त्यांचा पगार देता येईल; एवढाही व्यवसाय नाही. शिवाय किराया आणि वीजबिलही द्यायचे आहे.

हा व्यवसाय व रोजगार टिकविण्यासाठी सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे. किमान किराया आणि वीज बिल तर भरात येईल, एवढी सोय तरी सरकारने करावी. किराया अभावी जागा सोडावी लागल्यास मोठे नुकसान होणार आहे.
-आशिष फुलझेले, व्यावसायीक