esakal | मुलांनो, गणपती, महालक्ष्मीलाही येऊ नका गावी.. मुंबई, पुण्यात राहणाऱ्या मुलांना गावात येण्यास कोणी केला मज्जाव.. वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

people who live in mumbai and pune are restricted to come to Nagpur

एकवेळ दसरा, दिवाळीला घरी येणार नाहीत, पण गणपती आणि महालक्ष्मीच्या उत्सवात मात्र, सर्व कुटुंब एकत्रीत येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे मुलांनी गावी येऊ नये असे निरोप आधीच मिळाल्याने, मुलांसह संपुर्ण कुटुंबाचाच हिरमोड झाला आहे.

मुलांनो, गणपती, महालक्ष्मीलाही येऊ नका गावी.. मुंबई, पुण्यात राहणाऱ्या मुलांना गावात येण्यास कोणी केला मज्जाव.. वाचा 

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : गावातील जनतेला कोरोनाचा धोका कळला असल्याने आता गावकऱ्यांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. विदर्भात अनेकांच्या घरी पिढ्यानपिढ्या गणपती आणि महालक्ष्मीची परंपरा आहे. घरचा गणपती आणि महालक्ष्मी असल्यास, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात नोकरी, शिक्षणासाठी गेलेली मुले, सुना आवजुर्र्न गावात हजेरी लावतात. मात्र यावेळी त्यांना स्पष्टपणे गावी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.  

एकवेळ दसरा, दिवाळीला घरी येणार नाहीत, पण गणपती आणि महालक्ष्मीच्या उत्सवात मात्र, सर्व कुटुंब एकत्रीत येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे मुलांनी गावी येऊ नये असे निरोप आधीच मिळाल्याने, मुलांसह संपुर्ण कुटुंबाचाच हिरमोड झाला आहे.

अधिक वाचा -  मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या या खासदाराचे भाजपमध्ये गेलेल्यांच्या घरवापसीबद्दल मोठे व्यक्तव्य.. म्हणाले...

गणेशोत्सवासाठी नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या विदर्भातील मूळगावी येत असतात. करोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार नाही हे समजल्याने, उत्सवाचा उत्साहही कमी झाला आहे.

गणेश उत्सव अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला आहे. २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यानंतर दोन दिवसांनी महालक्ष्मींचे आगमन घरोघरी होणार आहे. बाहेरगावी राहणार्या मुलांना मात्र यंदा आपल्या मुळगावी येऊच नका असा निरोप कुटुंबाने पाठविला आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना गाव नियंत्रण समितीच्या सल्ल्याने १४ दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. 

नागरिकांनी परजिल्ह्यातून येण्याअगोदर क्वारंटाइन राहण्यासाठी घराची क्षमता, सोयी सुविधा काय आहेत, याची खात्री करूनच जिल्ह्यात यावे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्याचवेळी परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या घरातील स्थानिक सदस्यांवर घराबाहेर पडण्याकरता निर्बंध राहणार आहेत, असे अनेक नियम असल्याने, कुटुंबानेच आपल्या परगावी राहणार्या मुलांना येण्यास बंदी घातली आहे..

ही राहणार बंधने

  • गृह विलगीकरणाचे नियम मोडणे, ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश करणे इत्यादी कारणांसाठी ५ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
  • गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये.
  • गणेशोत्सवात गावात वाडीवाडी मध्ये एकत्र येऊन भजन, आरती न करता घरातील सदस्यांनीच भजन व आरती करावी.
  • सत्यनारायण महापूजा, सत्संग भजनांचे आयोजन करण्यात येऊ नये. यावर गाव नियंत्रण समितीने लक्ष ठेवावे.
  • गणपती विसर्जनावेळी एका गणपतीसोबत कुटुंबातील २ सदस्यांनीच उपस्थित राहावे. विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. विसर्जन मिरवणुका टाळाव्यात. यावरही गाव समितीचे लक्ष असणे आवश्यक आहे.
  • गणेशोत्सवादरम्यान एकमेकांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाऊ नये.
  • गणेश विसर्जनादिवशी अथवा महालक्ष्मी भोजनाच्या दिवशी कुणाला घरी बोलावू नये.
  • राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी गणेशभक्तांसाठी विशेष बसव्यवस्था करू नये.
  • बाहेरून जिल्ह्यातील गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ग्रामस्तरीय समितीकडे नोंद असणे आवशयक आहे. या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जावी.
  • गणपतीची पूजा स्वत:च करावी. पुरोहितामार्फत पूजा करण्यासाठी ऑलनाइन पूजेचा पर्याय निवडावा.

हेही वाचा - राज्यातील हजारो शिक्षकांना कसा मिळणार दिलासा ?...वाचा सविस्तर


संचारबंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य आणि पोलीस यंत्रणेसह इतर यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. परंतु, शहरी भागात ही स्थिती असली तरी ग्रामीण जनता मात्र, वेळीच सावध झाली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन यंदा गावात गणेशउत्सव, महालक्ष्मी उत्सवासाठी बाहेरगावातून येणार्यांना बंदी घालण्यात आली आहे.
दिवाकर मोहोड, 
पोलीस पाटील, केळवद, ता. सावनेर.
 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image