‘टू फिंगर्स टेस्ट’ची माहिती अभ्यासक्रमातून वगळा, उच्च न्यायालयात याचिका

 High Court
High Courtsakal

नागपूर : बलात्कार पीडितेचे कौमार्य तपासण्यासाठी (virginity test) केल्या जाणाऱ्या ‘टू फिंगर्स टेस्ट’ची (virginity test) माहिती सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमधून वगळण्याचे आदेश द्यावे, या विनंतीसह ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (nagpur bench of mumbai high court) जनहित याचिका दाखल केली आहे.

 High Court
नागपूर : कळमना बाजारात शेतकऱ्यांचीच कोंडी; माल फेकण्याची वेळ

या प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, ‘टू फिंगर्स टेस्ट’विरुद्ध डॉ. रंजना पारधी यांनी २०१० मध्ये या न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने ‘टू फिंगर्स टेस्ट’वर बंदी आणून बलात्कार पीडितेच्या कौमार्य चाचणीकरिता १० मे २०१३ रोजी नवीन मार्गदर्शकतत्वे निश्चित केली. २९ जानेवारी २०१४ रोजी उच्च न्यायालयाने ती मार्गदर्शकतत्वे स्वीकारून जनहित याचिका निकाली काढली.

तसेच, या मार्गदर्शकतत्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. असे असले तरी एम. बी. बी. एस. पदवीच्या दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमात समावेश असलेल्या एस. के. सिंगल यांच्या ‘फॉरेन्सिक मेडिसीन ॲण्ड ज्युरिसप्रुडेन्स’ पुस्तकात टू फिंगर्स टेस्टची माहिती व संदर्भ देण्यात आले आहेत असे, ॲड. सिंगलकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान, न्यायालयाने ‘टू फिंगर्स टेस्ट’चा उपयोग टाळण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत का? अशी विचारणा ॲड. सिंगलकर यांना केली. तसेच, याबाबत चार आठवड्यात माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com