
नागपूर : राज्यात कोरोनानंतर फार्मास्युटिकल क्षेत्रात निर्माण झालेल्या संधीतून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. त्यातून गेल्या तीन वर्षांमध्ये सव्वाशे महाविद्यालये आणि १६ हजारावर जागांमध्ये वाढ झाली. मात्र, या वाढीमुळे गेल्या तीन वर्षांपासून शाखेला रिक्त जागेची समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे.