esakal | लग्न कर किंवा तीन लाख दे, अन्यथा बदनामी करीन
sakal

बोलून बातमी शोधा

‘लग्न कर किंवा तीन लाख दे’, स्क्रीन शॉट केले व्हायरल

‘लग्न कर किंवा तीन लाख दे’, स्क्रीन शॉट केले व्हायरल

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : गावी भेट झालेल्या युवकाने पूर्वी मैत्री वाढविली. नंतर अचानक पवित्रा बदलत युवतीला धमकावणे सुरू केले. ‘लग्न कर, अथवा तीन लाख रुपये दे’ अशी त्याची मागणी होती. नकार देताच आरोपीने तिचे फोटो फेसबूकवर अपलोड करणे सुरू केले. याप्रकाराने भयभीत झालेल्या युवतीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रामरक्षा बघेल (२५, रा. दुर्जनीपूर, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी हद्दीत राहणारी २४ वर्षीय युवती काही वर्षांपूर्वी दुर्जनीपूर येथे गेली होती. तिथे रामरक्षासोबत तिची ओळख झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. नंतर युवती घरी परतली. सप्टेंबर २०१९ पासून दोघांचेही व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू होते. याचा फायदा घेत रामरक्षा याने स्क्रीन शॉटद्वारे घेतले.

हेही वाचा: पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पूजन करून चालवला ट्रॅक्टर

याद्वारे तो युवतीवर लग्नासाठी दबाव टाकू लागला. युवतीने नकार देताच त्याने लग्न करायचे नसल्यास ‘तीन लाख रुपये दे अथवा बदनामी करील’ अशी धमकी दिली. त्याने तिचे फोटोही फेसबुकवर अपलोड करणे सुरू केले. त्यामुळे युवती घाबरली. तिने अजनी ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पत्ते खेळण्यास मनाई केल्याने युवकावर हल्ला

एमआयडीसी भागातील शांतीनगरात राहणारा शैलेंद्र कनोजिया हा मंगळवारी दुपारी घरीच प्रेस करीत होता. वस्तीत राहणारा मुकुंद रावतेल व तीन साथीदार पत्ते खेळत बसले होते. शैलेंद्रने त्यांना घरासमोर पत्ते खेळण्यास मनाई केली. या कारणावरून संतापलेला मुकुंद व साथीदार जबरदस्तीने दार उघडून आत प्रवेश केला. लाकडी दांड्याने डोक्यावर मारून शैलेंद्रला जखमी केले.

हेही वाचा: चंद्रपूर : पावसात घुग्घुस नगरपरिषदेला भीषण आग

दुसरी घटना प्रतापनगरात घडली. दाते ले-आऊट, स्वावलंबीनगरातील रहिवासी मोहन शेरेकर (३८) हे मंगळवारी सकाळी खर्रा घेण्यासाठी शुभम वंदेकर याच्या भेंडे ले-आऊटमध्ये असलेल्या टू ब्रदर पान शॉपमध्ये गेले होते. कोणतेही कारण नसताना शुभमने लाकडी दांड्याने डोक्यावर मारून मोहन यांना जखमी केले.

loading image
go to top