esakal | शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पूजन करून चालवला ट्रॅक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पूजन करून चालवला ट्रॅक्टर

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पूजन करून चालवला ट्रॅक्टर

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भरपावसात स्टेअरिंग पकडून ट्रॅक्टर चालवला. यानिमित्त शिंगणे यांचे नवीन रूप नागरिकांना पहायला मिळाले. पालकमंत्री शिंगणे यांनी ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण केली. दोन-तीन दिवसांपासून सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता. ७) पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते.

तालुक्यातील किनगाव राजा जवळ असलेल्या पांग्री उगले येथील महिला शेतकरी रेखा परमराम उगले यांना पोखरा योजनेतून ट्रॅक्टर मिळाले आहे. त्यांनी मंगळवारी ट्रॅक्टर विकत आणले. परंतु, ट्रॅक्टरचे पूजन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्याचा आग्रह त्यांनी धरला. यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना भ्रमणध्वनीवरून याची माहिती देण्यात आली. पालकमंत्री शिंगणे यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या आग्रहाखातर पूजन करण्यासाठी होकार दिला.

हेही वाचा: चंद्रपूर : पावसात घुग्घुस नगरपरिषदेला भीषण आग

सकाळपासूनच तालुक्यात पाऊस सुरू असल्यामुळे महिला शेतकरी व परिवारातील सदस्य पावसात पालकमंत्री शिंगणे यांची वाट पाहत होते. रात्री ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास पाऊस सुरू असताना पालकमंत्री शिंगणे यांनी शेतकऱ्याच्या आग्रहाखातर भरपावसात उमरद फाट्यावर ट्रॅक्टरचे पूजन केले.

सद्या तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून नियोजनबद्ध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. यावेळी ठाणेदार युवराज लबडे, पालकमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे, श्रावण डोंगरे, भरत मोरे, कृषी सेवक प्रवीण बंगाडे, कृषी पर्यवेक्षक गजानन चौथे, दीपक साळवे, परसराम उगले, दत्तात्रय उगले यांच्यासह शेतकरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा: नागपूर विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी कायम! नॅककडून शिक्कामोर्तब

गावे स्वयंपूर्ण होणे गरजेचे

पोखराअंतर्गत असलेले गावे व इतर गावातील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावाचा व परिसराचा विकास करण्यासाठी भर दिला पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून गावे स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

loading image
go to top