esakal | Nagpur : पाईपलाईन फुटली, आदित्य ठाकरेंनी घेतली दखल
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : पाईपलाईन फुटली, आदित्य ठाकरेंनी घेतली दखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भांडेवाडी ते कोराडी उर्जा प्रकल्पापर्यंत प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी दुपारी फुटली. त्यामुळे हजारो लिटर प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहूने गेले. महिलेने याबाबत ट्विट करून ते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केले. पर्यटनमंत्री ठाकरे यांनी या ट्विटची दखल घेत महापालिकेला याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

हेही वाचा: Corona Update : राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली

महापालिकेने कोराडी उर्जा प्रकल्पाला प्रक्रिया केलेले सांडपाणी विकले. भांडेवाडी ते कोराडी उर्जा प्रकल्पापर्यंत प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास उत्तर नागपुरातील राजीवनगर परिसरात रस्त्यावरून जात असलेल्या एका ट्रकने या पाईपलाईनच्या व्हॉल्वला धडक दिली. व्हॉल्व तुटल्यामुळे आकाशाच्या दिशेने मोठा फवारा उडाला.

जवळपास पाऊण तास या फवाऱ्यातून पाणी वर उडत होते. नागरिकांसाठीही हा फवारा आकर्षणाचा केंद्र ठरला. परंतु या परिसरातील निवासी प्रा. शिल्पा बोडखे यांनी या फवाऱ्याचा व्हीडीओ व फोटो काढले. हे सर्व फोटो व व्हीडीओ त्यांनी ट्विटर अकाऊंटवर अपलोड केले व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. पाईपलाईन फुटली असून कोणताच महापालिकेचा एकही अधिकारी येथे पोहोचला नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये नमुद केले.

हेही वाचा: रत्नागिरी: आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प

आदित्य ठाकरे ट्विटरवर सक्रीय असते. त्यामुळे त्यांनी ट्विट बघितल्यानंतर तत्काळ महापालिकेला ट्विट टॅग करून लक्ष देण्याची सूचना केली. दरम्यान, काही वेळातच महापालिकेचे अधिकारी येथे पोहोचले. त्यांनी तत्काळ प्रक्रिया केंद्रावरून पाईपलाईन बंद केली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पाईपलाईन बंद करण्यात आली. त्यामुळे तासाभरात हजारो लिटर पाणी पाहून गेले. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

"दुपारी दीड वाजताच्या सुमारास ट्रकने धडक दिल्यामुळे जलवाहिनीचा व्हॉल्व तुटला. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना प्रक्रिया केंद्रावरून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा थांबविण्याचे निर्देश दिले. जलवाहिनीवर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहे."

- श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता, महापालिका

loading image
go to top