school issue
sakal
नागपूर - ती म्हणाली मला पुन्हा शाळेत घ्या. शिक्षक म्हणाले, आम्ही घेणार नाही. तुझी टीसी अर्धवट आहे. आता तिला पूर्ण करून देतो, तू ती घेऊन जा. सात वर्षांच्या अनयाला कळले नाही. आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर बघताना ती घाबरली. तिला काहीच कळले नाही. एवढेच तिला कळले मी आता शाळेत जाणार नाही. मात्र, आईला चिंता आता तिच्या भवितव्याची आहे. कोण तिला शाळा देईल?