esakal | बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकॉकल लसीकरण मंगळवारपासून
sakal

बोलून बातमी शोधा

बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकॉकल लसीकरण मंगळवारपासून

बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकॉकल लसीकरण मंगळवारपासून

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना न्यूमोकॉकल आजार (Pneumococcal disease) होत असून, त्यात मुले दगावण्याचीही शक्यता आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी महापालिका मंगळवारपासून निःशुल्क न्यूमोकॉकल लसीकरण (Pneumococcal vaccination) मोहिमेला सुरवात करीत आहे. उद्या सकाळी दहा वाजता महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) फुटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीकरण मोहिमेला सुरवात करतील. (Pneumococcal-vaccination-to-prevent-infant-mortality-from-Tuesday)

न्यूमोकॉकल लसीकरण मोहिमेसंदर्भात आज टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डॉ. साजिद खान, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व डॉ. नरेंद्र बहिरवार उपस्थित होते. न्युमोकॉकल आजार होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. या लसीमुळे न्युमोकॉकल आजारापासून बाळाचे संरक्षण होईलच, शिवाय समाजातील इतर घटकांमध्ये न्युमोकॉकल आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा: मित्रांनो, मी आत्महत्या करीत आहे, मृतदेह घेण्यासाठी लवकर या

शहरातील एकूण ५३ लसीकरण केंद्रावर व ९८७ बाह्य सत्रांमध्ये ही लस देण्यात येईल. टास्क फोर्स समितीच्या सभेमध्ये डॉ. विजय जोशी, डॉ. रवी धकाते, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. मंजूषा गिरी, डॉ. ज्योत्सना देशमुख, डॉ. अर्शिया शेख, डॉ. कृपाली लिल्लारे यांच्यासह सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.

लसीकरण केल्यास बालकांमधील न्युमोकॉकल आजार व त्यामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यास मदत होईल. बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालकांनी आपल्या बाळांना ही लस द्यावी.
- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा: दीड लाखाच्या बदल्यात जीव! गोंदियात ॲसिड टाकून तरुणाचा खून

या आजाराची मुख्य लक्षणे खोकला, ताप येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

(Pneumococcal-vaccination-to-prevent-infant-mortality-from-Tuesday)

loading image