तब्बल दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन होता फरार; अखेर नागपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

Police Caught prisoner who ran away from hospital in Nagpur
Police Caught prisoner who ran away from hospital in Nagpur

नागपूर ः मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या कैद्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. जवळपास दोन महिने फरार असलेल्या कैद्याला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी अकोल्यातून अटक केली. मजीद अहमद उर्फ बंबईया अब्बास अली (२९, रा. मोठा ताजबाग, सक्करदरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मजीद अहमद याने सक्करदरा हद्दीत एका युवकाचा खून केला होता. तो हत्याकांडाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. त्याची अचानक प्रकृती खराब झाल्यामुळे गेल्या १८ ऑक्टोबरला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास कैदी मजीद अहमद याने पोलिसांना गुंगारा देत मेडिकलमधून पळ काढला. 

जेल सुरक्षारक्षक अमोल पाखरे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. फरार झालेला कैदी थेट ट्रकने शहरातून पळून गेला होता. अकोल्यात गेला आणि त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने तो राहायला लागला. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, ईश्‍वर जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक बलराम झाडोकार यांच्या पथकाला आरोपीबाबत माहिती मिळाली. पोलिसांचे पथक अकोल्यातील मोठी उमरी परिसरात गेले. तेथे सापळा रचून आरोपी मजादला अटक केली. 

बनला बांधकाम मजूर 

मजीद अहमद पळून गेल्यानंतर त्याने थेट अकोल्यातील मोठ्या उमरीत राहणारे नातेवाईक गाठले. त्याने एका बांधकाम ठेकेदाराची भेट घेतली. निर्माणाधिन इमारतीवर बांधकाम मजुर म्हणून काम करायला लागला. गेल्या दोन महिण्यांपासून अकोल्यात राहत होता. दिवाळीला तो घरीसुद्धा येऊन गेल्याची माहिती आहे.

आणखी एक कैदी फरारच 

गेल्या ७ नोव्हेंबरला मेडिकलमध्ये कोरोना बाधित झालेला कैदी नरेश महिलांगे याला झोन फोरमधील हुडकेश्‍वर पोलिसांनी प्रॉडक्शन वारंटवर ताब्यात घेतले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास तो पोलिस कर्मचारी अरूण पाटील आणि राजेंद्र लेंडे यांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात अद्याप त्या कैद्याच केवळ शोधच सुरू आहे. हे प्रकरणसुद्धा क्राईम ब्रॅंच दिल्यास सुटू शकते. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com