esakal | पिस्टल दुरुस्त करणं पडलं महाग, पोलिस कर्मचाऱ्याच्या मांडीत घुसली गोळी
sakal

बोलून बातमी शोधा

काडतुसे

पिस्टल दुरुस्त करणं पडलं महाग, पोलिस कर्मचाऱ्याच्या मांडीत घुसली गोळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्यात (beltarodi police station nagpur) बीट मार्शल पदावर कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने लॉक झालेली पिस्टल दुरुस्त करताना अचानक गोळी चालली. ती गोळी थेट कर्मचाऱ्याच्या मांडीतून आरपार झाली. गंभीर जखमी अवस्थेत पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेषकुमार इंगळे (३५) असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. (police injured while repairing pistol in nagpur)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेषकुमार इंगळे हे पोलिस नायक पदावर असून ते बेलतरोडी पोलिस ठाण्यात तैनात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे बीट मार्शल म्हणून जबाबदारी आहे. आज शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास शेष कुमार परिसरातून गस्त मारून पोलिस ठाण्याकडे जात होते. दरम्यान, ते चहा घेण्यासाठी एका चहाच्या टपरीवर थांबले. चहा घेण्यापूर्वी त्यांचे लक्ष पिस्तुलकडे गेले. त्यांनी पिस्तुल बाहेर काढले आणि साफ केले. ते पिस्तुल लॉक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पिस्टल मांडीवर ठेवून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या बोट ट्रिगरवर असल्याने ओढातानीत ते दबल्या गेले. त्यामुळे पिस्तुलातून गोळी चालली. गोळी थेट शेष कुमार यांच्या माडीत घुसली. गोळी चालल्याचा आवाज होताच एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये धावपळ झाली. तोपर्यंत शेष कुमार यांच्या मांडीतून खूप रक्तस्त्राव होत होता. शेषकुमार यांनी रूमालाने मांडी बांधून घेतली. अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती दिली. शेष कुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

loading image