रक्षकच बनले भक्षक! पोलिस कर्मचाऱ्याकडून दोन बहिणींचा विनयभंग, सेवेतून तत्काळ निलंबन

police suspended in case of bad behavior with girls in nagpur crime news
police suspended in case of bad behavior with girls in nagpur crime news
Updated on

नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींना पोलिस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवून विनयभंग केला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. पोलिस आयुक्तांकडून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. रवी तिवारी, असे आरोपी पोलिस शिपायाचे नाव आहे.

रवी तिवारी हा पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. पीडित मुली या १७ व १५ वर्षांच्या असून गिट्टीखदानमधील रहिवासी आहेत. त्यांना पोलिस दलात भरती व्हायचे आहे. गेल्या २१ फेब्रुवारीला त्या पोलिस मुख्यालय परिसरात चौकशीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी दोघीही बहिणींची भेट तेथील पोलिस कर्मचारी रवी तिवारीशी झाली. भरती होण्यासाठी प्रशिक्षण देण्यास मदत करण्याचे आमिष दाखवले. दुसऱ्या दिवशीपासून तो त्यांचा पाठलाग करू लागला. मुलींच्या घरासमोर असलेल्या पानठेल्यावर आरोपी नेहमी उभा राहून सिगरेट प्यायचा व मुलींना एकटक बघायचा. तिच्या कुटुंबीयांना आरोपीच्या वर्तणुकीवर संशय आला. त्यांनी आरोपीकडे प्रशिक्षण घेण्यास नकार दिला. 

थेट पोहोचला घरी - 
रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास तिवारी त्यांच्या घरी गेला. दोन्ही मुलींना मैदानावर पाठविण्यासाठी दबाव टाकू लागला. शेवटी मुलींच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. गिट्टीखदान पोलिसांनी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिस ठाण्यातून प्राप्त विशेष अहवालानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला निलंबित केले. 

पोलिसांना झाले तरी काय? 
गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. यशोधरानगर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निरीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, तर गिट्टीखदानमध्ये एका पोलिस निरीक्षकाविरुद्धच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. मानकापूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह दोन शिपाई व मुख्यालयातील कर्मचाऱ्याविरुद्ध हलगर्जी प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना झाले तरी काय? असा प्रश्‍न पडला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com