धक्कादायक! लुटीतील पैशांवर पोलिसांचा डल्ला? आरोपींना गंगाजमुनात पकडल्यानंतर हिसकावली होती बॅग

police took money from criminals in Nagpur
police took money from criminals in Nagpur
Updated on

नागपूर ः धंतोली हद्दीतील एलआयसी चौकात एका महिलेची तिघांनी बॅग हिसकावून लूटमार केली. ते आरोपी मौजमजा करण्यासाठी गंगाजमुनात गेले. तेथील दोन चार्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना लूटमार केलेली जवळपास २५ हजार रुपयांची रक्कम पोलिस कर्मचाऱ्यांनी हिसकावून घेतली. त्यानंतर तिघांवर हत्यार कायद्याअंतर्गत कारवाई केली. त्या आरोपीबाबत धंतोली पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गंगाजमुनातील पोलिसांनी रक्कम लुटल्याचे धंतोली पोलिसांना सांगितले. या प्रकाराची पोलिस दलात आज खमंग चर्चा आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश, करण यांनी धंतोलीत एका नर्सची बॅग हिसकावून पळ काढला. आरोपी दुचाकीने पळून गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास गंगाजमुनात गेले. गणेशला तेथील चार्लीने पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पैशाचे बंडल आणि चाकू मिळून आला. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचे २५ हजार रुपये हिसकावून घेतले आणि ठाण्यात नेऊन चाकू सापडल्याची कारवाई केली. 

दरम्यान धंतोली पोलिसांनी करणने लूटमार केल्याचे निष्पन्न केले. त्यांनी लकडगंज पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्याला लुटलेल्या पैशांबाबत विचारणा केली. गणेश आणि करणने ते पैसे गंगाजमुनात पोलिसांनी हिसकावल्याचे सांगितले. त्यामुळे धंतोली पोलिसांनी लकडगंज पोलिसांशी संपर्क केला आणि आरोपींच्या बयाणाबाबत सांगितले. त्यामुळे लकडगंज पोलिसांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी लगेच दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. ती रक्कम हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न ?

पोलिसांनी आरोपींकडून कुटलेली रक्कम धंतोली पोलिसांनी परत करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ती रक्कम पोलिसांनी नजरचुकीने घरी नेल्याच्या भूमिकेवर लकडगंज पोलिस ठाम आहे. लूटमार केलेली रक्कम पोलिसांनीच लुटल्याची खमंग चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये होती.

आरोपींना आमच्या कर्मचाऱ्यांनी गंगाजमुनात पकडले होते. त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या अंगझडतीत सापडलेली रक्कम एका पोलिस कर्मचाऱ्याने ताब्यात घेतली. त्याची नाईट ड्यूटी झाल्यामुळे तो नजरचुकीने ती रक्कम घेऊन घरी गेला. त्याला फोन केल्यानंतर तो झोपलेला असल्यामुळे फोन उचलत नव्हता. मात्र त्याने ती रक्कम पोलिस ठाण्यात परत आणून दिली.
- पराग पोटे 
(ठाणेदार, लकडगंज पोलिस स्टेशन)

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com