esakal | सुपारी किलर रणजित सफेलकरच्या ‘राजमहाल’वर चालणार बुलडोजर; पोलिस विभाग ॲक्शन मोडमध्ये

बोलून बातमी शोधा

सुपारी किलर रणजित सफेलकरच्या ‘राजमहाल’वर चालणार बुलडोजर; पोलिस विभाग ॲक्शन मोडमध्ये
सुपारी किलर रणजित सफेलकरच्या ‘राजमहाल’वर चालणार बुलडोजर; पोलिस विभाग ॲक्शन मोडमध्ये
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ऑटोचालक ते गॅंगस्टर बनलेल्या कुख्यात गुंड रणजित सफेलकर याचा कामठीतील ‘राजमहाल’ नावाचा टोलेजंग बंगल्यावर कामठी नगरपरिषदेचा बुलडोजर चालणार आहे. सफेलकरचे साम्राज्य खालसा करण्यासाठी नगरपरिषद आणि पोलिस विभागाने तयारी केली आहे. बुधवारी सफेलकरचा राजमहाल जमीनदोस्त होणार आहे.

हेही वाचा: अंत्यसंस्कारासाठी महापालिका देणार मोफत लाकडे; फक्त कोरोनाने मृतपावलेल्यांसाठी सुविधा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष श्रीवास हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात रणजित सफेलकर, त्याचे साथीदार भरत हाटे कालू हाटे, इशाक मस्के, हेमंत गोरखा बाथो याला अटक केली आहे. सध्या सर्व जण गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत आहेत. सफेलकर याने पाच कोटी रुपयांची सुपारी घेऊन आर्किटेक एकनाथ निमगडे यांची हत्या केली होती. मात्र त्याला कोणी सुपारी दिली हे मात्र अद्यापही हायटेक गुन्हेशाखा पोलिसांना कळू शकले नाही. सफेलकर व त्याच्या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

जुनी कामठीतील खंडणी प्रकरणात सफेलकर तर मोक्का प्रकरणात त्याचे साथीदार गुन्हे शाखा पोलिसांच्या कोठडीत आहेत. सफेलकर याच्याविरुद्ध आतापर्यंत खून, खंडणी, बळजबरीने ताबा घेण्यासह चार पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी सफेलकर याची पोलिस कोठडी संपणार असून, पोलिस त्याला न्यायालयात हजर करून पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करतील. सफेलकरला कामठीत आपले प्रस्थ निर्माण करायचे होते. त्यासाठी त्याने सर्वप्रथम मोठा ‘राजमहाल’ सारखा बंगला बांधण्याचे ठरविले होते. स्वप्नातील बंगला अशी ओळख असलेला सफेलकरचा राजमहाल बुधवारी जमीनदोस्त होणार आहे.

हेही वाचा: के.टी. नगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू; सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होणार लाभ

सुपारीच्या पैशातून ‘राजमहाल’

रणजित सफेलकरला काही राजकीय नेतेमंडळीचा वरदहस्त होता. एका माजी मंत्र्यासोबत त्याची धंद्यात पार्टनरशिपसुद्धा होती. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी राजू बद्रे आणि संतोष आंबेकर यांच्यापेक्षा मोठा बंगला बांधण्याचे सफेलकरचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने हत्याकांडासाठी घेतलेल्या सुपारीच्या पैशातून टोलेजंग बंगला बांधल्याची चर्चा आहे. मात्र, सफेलकरचे राजमहालमध्ये राज करण्याचे स्वप्न मात्र भंग होणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ