esakal | जनतेला ‘कॅश’ करण्यासाठी भाऊंनी लढवली शक्कल; पाच हजार मिळवून देतो, कागदपत्रे जमा करा
sakal

बोलून बातमी शोधा

The political leader lured the citizens

नेमके हेच हेरून आणि ग्रामीण कामगारांचे अज्ञान बघून या लोकांच्या  योजनेवर आता ग्रामीण भागात  विविध राजकीय नेत्यांनी डोळा ठेवल्याचे दिसून येत आहे.  जे गरजू आणि लाभार्थी नाहीत, असे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आप्तस्वकीय यांना लाभ भेटावा म्हणून आणि आपली राजकीय पोळी शेकता यावी म्हणून बोगस कामगार नोंदणी केली जात आहे.

जनतेला ‘कॅश’ करण्यासाठी भाऊंनी लढवली शक्कल; पाच हजार मिळवून देतो, कागदपत्रे जमा करा

sakal_logo
By
संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि.नागपूर) : जनतेला ‘कॅश’ करण्यासाठी राजकीय नेते कोणती शक्कल लढविणार, याचा नेम नाही. निवडणुकीत मतांची बेरीज व्हावी, याकरिता लोकांना वेठीस धरण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून तुमच्या खात्यात पाच हजार मिळवून देतो. कागदपत्रे जमा करा, असे आमिष देण्याचे काम अरोलीत एका ग्रामपंचायत सदस्याने सुरु केले आहे.  

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने असंघटित कामगार, मजूर यांच्याकरिता एकवीस प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात.  असंघटीत कामगार आणि मजूर यांच्या उत्थान आणि कल्याणाकरिता या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

जाणून घ्या - हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा

त्याद्वारे  कामगरांकरिता आणि त्यांच्या कुटुंबीयाकरिता  एकवीस  प्रकारच्या विविध आर्थिक , सामाजिक आणि आरोग्यविषयक योजना राबविल्या जातात. नेमके हेच हेरून आणि ग्रामीण कामगारांचे अज्ञान बघून या लोकांच्या  योजनेवर आता ग्रामीण भागात  विविध राजकीय नेत्यांनी डोळा ठेवल्याचे दिसून येत आहे.  जे गरजू आणि लाभार्थी नाहीत, असे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आप्तस्वकीय यांना लाभ भेटावा म्हणून आणि आपली राजकीय पोळी शेकता यावी म्हणून बोगस कामगार नोंदणी केली जात आहे.

गावागावात या मंडळाची अधिकृत परवानगी न घेता जाहीर दवंडी  देऊन काही महाठग  पाच हजार रुपये मिळवून देण्याचे आणि नूतनीकरण  करून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून  कागदपत्रे गोळा करीत  राजकीय हेतू साध्य करीत आहेत. मात्र यात सर्वसामान्य मजूर भरडला  जात आहे.

अधिक माहितीसाठी - दिवसा चटके, पहाटे थंडी; सोबतीला उद्यापासून वादळी पाऊसही

गावात दिली दवंडी
मौदा तालुक्यातील अरोली येथे असाच विचित्र प्रकार सुरु आहे. राजकीय नेत्याच्या  छत्रछायेत राहून येथील ग्रामपंचायत सदस्य लोकांची दिशाभूल करून फसवणूक करीत आहे. बांधकाम कल्याणकारी मंडळात  या भागातील बऱ्याच मजुरांची नोंदणी झालेली आहे. आणि आता बनावट मजुरांची नोंद झाली असल्याने या भागातील ‘ऑफलाइन’ सभासद नोंदणी आणि नूतनीकरण  प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. याबाबतची चुणूक लागण्याने नेत्यांसोबत मंडळाचे  कार्यालय  गाठीत संबधित मंडळावर  धावा केल्याचे  शोषल मीडियावर चित्र रंगविले. पिवळे पुस्तक नूतनीकरण करून देतो कागदपत्रे जमा करा, अशी दवंडी गावात ग्रामपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता देण्यात आली. राजकीय स्वार्थापोटी मजुरांच्या भावनेचा गौडबंगाल केले जात आहे.

‘भाऊं’नी ऑनलाईनसाठी नियुक्त केला सेतू संचालक
 भाऊंच्या या खेळीची इकडे गावात चर्चा सुरू झाल्यावर भाऊंनी यादी तयार केलेल्या लोकांना गावातील एका सेतू संचालकाकडे शंभर रुपयाप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया करायला लावले आणि ऑनलाईनच्या पावत्या जमा करण्याचे सोंग घेतले.

हेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून

नेमकी काय आहे ऑनलाइनची प्रक्रिया
 कामगार कल्याणकारी मंडळात ऑनलाईन नोंदणी किंवा नूतनीकरण  करण्याकरिता कसलेही शुल्क लागत नाही. मंडळाच्या https://mahabocw. in या वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करता येते. मोबाईलद्वारे पण नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करता येते. नंतर फॉर्म सबमिट केल्याच्या एक विशिष्ट नंबर  प्राप्त होतो आणि त्यानंतर मंडळामार्फत अर्जाची पडताळणी करण्याकरिता देय तारखेला मंडळात बोलावले जाते.

आमचा अजिबात संबंध नाही !
या दवंडी आणि योजनेचा ग्रामपंचायतशी काहीएक संबंध नाही. राजकीय नेत्यांसोबत मंडळात जाऊन काय प्रकार करताहेत, याबाबत आमचा संबंध नाही.
- संदीप मलधाम
सरपंच, अरोली

संपादन - विजयकुमार राऊत

loading image
go to top