नागपूरची हवा केंद्राला मानवली : प्रदूषण केंद्र बंद तरीही उपराजधानी स्वच्छ

सिव्हिल लाइन्स येथील मुख्य पोस्ट कार्यालयात वर्षभर वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषण मोजले जाते
air pollution
air pollution sakal

नागपूर : वर्षातील १८० दिवस प्रदूषण(pollution) मोजले नसतानाही शहराची हवा अगदी स्वच्छ असल्याचा अहवाल सादर करणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा(Central Pollution Control Board) कारभारही हवेवरच सुरू असल्याचे दिसून येते. नागपूरची गणना स्वच्छ प्रदूषण मुक्त शहर करण्यासाठी हा खटाटोप केल्या जात असल्याची शंका पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागपूरची हवा केंद्र सरकारला(central government) मानवली अशी चर्चा आहे.

air pollution
वर्धेतील नवरगाव सिंधुताईंची जन्मभूमी; जिल्ह्यात केले बरेच कार्य

सिव्हिल लाइन्स येथील मुख्य पोस्ट कार्यालयात वर्षभर वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषण मोजले जाते. मात्र, शहरात २०२१ या वर्षातील ३६५ दिवसांपैकी १८१ दिवस प्रदूषण मोजलेच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवसातही वायू प्रदूषण मोजले गेले नव्हते. मात्र, उर्वरित १५८ दिवस शहरातील हवा अगदी स्वच्छ हवा होती असेही अहवालात म्हटले आहे.शहरात केवळ २६ दिवस प्रदूषण असून त्यातील २५ दिवस हवा प्रदूषण एक्यूआर साधारण प्रदूषण तर केवळ एक दिवस हवा खराब असल्याचे म्हटले आहे. डिसेंबर २०२१ या महिन्यात एकही दिवस प्रदूषण मोजण्यात आलेले नसल्याचे दिसून आले आहे. नागपूर शहरातील वायुप्रदूषणाचा स्तर बराच कमी असल्याचे नेहमीच सांगितले जाते. शहरात चार चार केंद्र आहेत. त्यातील दोन केंद्र कायम बंद असल्याचे अहवालातून उघडकीस आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला खरोखरच प्रदूषण तपासायचे आहे की निव्वळ औपचारिकता करायची आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

प्रदूषणाच्या केलेल्या मॉनिटरिंगमध्ये सर्वच शहरांतील स्थिती चिंताजनक दिसून येत आहे. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण १०० पीएमपेक्षा (पार्टिक्युलेट मॅटर) अधिक असू नये, असे तज्ज्ञ सांगतात. प्रदूषणाची ही मात्रा दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. केंद्र सरकारने देशातील १०२ शहरे प्रदूषित घोषित केली आहे. यात महाराष्ट्रातील १८ शहरे असून नागपूरचाही त्यात समावेश आहे, असे असतानाही नागपूरचे प्रदूषण कमी का दाखविण्यात येत आहे. शहरात कारखाने, रस्ते वाहतूक, वाहनातून होणारे प्रदूषण आणि रस्त्याची दुरावस्थामुळे वातावरणात कार्बन मोनोऑक्‍साइड, अमोनिया इतर रसायनासह अतिसूक्ष्म धुळीकण वाढले आहे. मात्र, त्याची नोंदच केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, देशात हीच आकडेवारी ग्राह्य धरून ती संशोधन कार्यासाठी वापरली जाते.

air pollution
वर्धेतील इंग्रज कालीन इमारतीला आग; राणीलक्ष्मीबाई यांच्या भावाने केले काम

"देशात आणि जगात केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी विविध संशोधन कार्यासाठी वापरली जाते,जर प्रदूषण मोजले गेले नाही किंवा ते कमी दाखविले तर यातून चुकीचा संदेश जातो. नागपूर शहर हे आधीच प्रदूषित क्षेत्र म्हणून प्रदूषण मंडळाच्या यादीत असताना अशा प्रकारे प्रदूषणाची आकडेवारी नसणे ही फार मोठी चूक आहे"

-प्रा सुरेश चोपणे अध्यक्ष ग्रीन प्लानेट सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com