Poorti Arya
Poorti AryaSakal

मेहनतीच्या जोरावर ‘पूर्ती’चे अभिनय क्षेत्रात नाव

मध्यंतरी नेपोटिसम‍ या मुद्यावरुन बॉलिवूडवर अनेकांनी टीका केली. वशिलेबाजीनेच या सेलिब्रिटींनी ग्लॅमर मिळविले अशी ओरड आजही होत असते.

नागपूर - मध्यंतरी नेपोटिसम‍ या मुद्यावरुन बॉलिवूडवर अनेकांनी टीका केली. वशिलेबाजीनेच या सेलिब्रिटींनी ग्लॅमर मिळविले अशी ओरड आजही होत असते. मात्र, ग्लॅमरच्या याच दुनियेत स्वबळावर आणि मेहनतीने आपले स्थान निर्माण करणारे देखील अनेक आहेत. यातीलच एक कलावंत म्हणजे नागपूरकर पूर्ती आर्य. हिंदी चित्रपटसृष्टी, मालिका, जाहिराती अशा अनेक माध्यमातून तीचा अभिनय पडद्यावर पाहायला मिळतो आहे.

पूर्तीचे वडील वेदप्रकाश आर्य नगरसेवक आणि आई शिक्षिका आहे. घरातील एकही व्यक्तीचा कला क्षेत्राशी कुठलाही संबंध नसताना पूर्तीने या क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. शहरातून तीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर, २०१३ साली मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथून ‘फॅशन स्टाइलिंग’मध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीने मुंबई गाठले. येथूनच तिचा हा प्रवास सुरु झाला, असे म्हटल्यास हरकत नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ती कलावंतांची फॅशन आणि स्टाईलवर लक्ष देऊ लागली.

२०१४ साली प्रथम तीला कब टीव्हीवरील सिंहासन बत्तीसी या मालिकेमध्ये रोल मिळाला. आपली फॅशनची दुनिया आणि अभिनयाचा प्रवास ती जोडीने करायला लागली. या दरम्यान तीला प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेता शिविन नारंग, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता वरुण मित्रा, रोहीत शेट्टी आदी दिग्गज कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अभिनय हीच आपली आवड आहे, ही बाब लक्षात घेऊन पूर्तीने २०१७ सालापासून पूर्ण वेळ अभिनयाला देणे पसंत केले. नाव कमवूनही तीने शिक्षण सोडले नसून सध्या ती इंटेरियर डिझायनिंगचे धडे घेत आहे.

मुंबईने मला ओळख दिली असली तरी नागपूर मला खूप-खूप आवडते. माझे पूर्ण लहानपण नागपूरमध्ये गेले आहे. आजही मी नागपूरला यायची संधी शोधत असते.

- पूर्ती आर्य, अभिनेत्री

  • चित्रपट : जलेबी (२०१७, रेणू माथुर)

  • मालिका : इंटरनेट वाला लव्ह (कलर्स टिव्ही, तनीषा)

  • मालिका : बडे अच्छे लगते है (सोनी टिव्ही, व्टिंकल सिंग)

  • मालिका : नारायण-नारायण (बिग मॅजिक, व्रिंदा)

  • वेब सिरीज : हाय तौबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com