फ्लॅशबॅक : विमानापुढे आठ डुकरं आल्याने उपराजधानीत थोडक्यात बचावले होते प्रणबदा 

मानकापूर ः पाच वर्षांपूर्वी क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात नागपूर गौरव ग्रंथाचे प्रकाशन करताना प्रणव मुखर्जी. यावेळी तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले होते. याच कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य
मानकापूर ः पाच वर्षांपूर्वी क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात नागपूर गौरव ग्रंथाचे प्रकाशन करताना प्रणव मुखर्जी. यावेळी तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले होते. याच कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य
Updated on

नागपूर  ः  १५ सप्टेंबर २०१५ रोजी नागपुरात कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमानतळावर उतरले होते. विमान उतरत असताना धावपट्टीवर अचानक आठ डुकरं पुढे आले होते. विमानाच्या पायलटने प्रसंगावधान राखले. या संकटातून प्रणव मुखर्जी थोडक्यात बचावले. विमानतळ प्राधीकरणाने या घटनेची तत्काळ चौकशी केली होती. 

नागपूर शहरात विचारस्वातंत्र्य, उदारता आणि सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती आहे. त्यामुळेच देशभरातील नागरिकांना नागपूरचे आकर्षण असून या शहरात राहण्यासाठी पसंती देतात, या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वक्तव्याची आज नागपूरकरांना आठवण झाली नसेल तर नवलच. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे शहरातील अनेक कार्यक्रम नागपूरकरांच्या स्मृतीपटलावर कोरले आहेत. महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रणव मुखर्जीच्या भाषणाने नागपूरकरांचा अभिमानाने उर भरून आला होता.

महापालिकेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव १५ सप्टेंबर २०१५ रोजी पार पडला. या कार्यक्रमासाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मानकापूर येथील क्रीडा संकुलात पार पडलेल्या या सोहळ्यात तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागरराव, केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी महापालिकेच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन केले होते. 

या दिमाखदार सोहळ्यात प्रणव मुखर्जी यांनी नागपूर शहराचा गुणगौरव केला. नागपूर शहराची सर्वांना सामावून घेण्याच्या वृत्तीमुळेच देशभरातील नागरिक व्यवसाय, नोकरीसाठी येथे आले आणि येथेच वसले, असे त्यांनी नमुद केले होते. नागपूर महापालिका लोकांना पुरवित असलेल्या सेवा, सुविधांमुळेही हे शहर राहण्यायोग्य आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली होती. यावेळी तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी सन्मानपत्र देऊन नागपूरकरांतर्फे त्यांचा गौरव केला होता.

संपादित : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com